कुख्यात गुंड शरद मोहोळने मृत्युपूर्वी नगरमध्ये घेतला होता प्लॉट, आता पत्नीकडून ‘येथे’ ताबा घेण्याचा प्रयत्न

पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याचे पुन्हा एकदा नगर कनेक्शन समोर आले आहे. तसेच त्याच्या पत्नीने देखील नगरमध्ये प्लॉटवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.

mohol

Ahmednagar News :  पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याचे पुन्हा एकदा नगर कनेक्शन समोर आले आहे. तसेच त्याच्या पत्नीने देखील नगरमध्ये प्लॉटवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.

शरद मोहोळ याने नगरमधील नालेगाव येथे प्लॉट घेतला होता. मात्र, मूळ मालकाच्या परस्पर विक्री केलेला होता. त्यामुळे मुळ मालकाने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने ताब्यात घेण्यास मनाई करूनही मोहोळ याच्या पत्नीच्या सांगण्यावरून दोघा जणांनी प्लॉटचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी रामेश्वर बालुराम कलवार (रा. चैतन्य नगर सावेडी, नगर, हल्ली रा. विमाननगर, पुणे) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

अक्षय सतीश डाके (रा. नगर), शाहीद सैद शेख (रा. नगर), स्वाती शरद मोहोळ (रा. पुणे) यांच्यासह अन्य पाच जणांचा आरोपीमध्ये समावेश आहे. फिर्यादीनुसार, नालेगाव येथे रामेश्वर कलवार याचे वडील बालुराम रघुनाथ कलवार यांच्या नावाने एक प्लॉट होता. मात्र २०१९ मध्ये त्यांचे वडिलांचे निधन झाले.

हीच संधी साधत सुवेंद्र संतोष डाबी याने वडिलांच्या जागी बनावट व्यक्ती उभा करून ४ जानेवारी २०२३ रोजी बनावट खरेदी केली. हे समजल्यानंतर संतोष डांबी याच्याविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी डाबी याला अटक केली.

त्यानंतर डाबी जामीनावर बाहेर आला. त्याने न्यायालयाच्या अटी-शर्तीचे उल्लंघन करीत पुन्हा १ जून २०२३ रोजी प्लॉट पुण्यातील शरद हिरामन मोहोळ (रा. शिवतीर्थ कोथरूड, पुणे) यांना विक्री केला.

ही खरेदी रद्द करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला. मात्र, संतोष डाबी याच्याविरुद्ध न्यायालयात सुनावणी सुरू असताना पुन्हा या प्रकरणामध्ये कोणीही हस्तक्षेप करू नये, असे न्यायालयाने सुनावले. दरम्यान, ५ मे २०२४ रोजी शरद मोहोळ याचा मृत्यू झाला.

दरम्यान, त्या प्लॉट सीसीटीव्ही कॅमेरे बसून वॉचमन ठेवण्यात आले होते. ७ ऑगस्ट २०२४ रोजी वॉचमन तिथे नसताना काही लोक तिथे घुसले त्यांनी जेसीबीने सीसीटीव्ही तोडफोड करून पत्रे लावले. ही बाब वाचमनने सांगितल्यानंतर मॅनेजर प्रल्हाद पुरोहित यांना प्लॉटवर जाण्यास सांगितले.

ते प्लॉटवर गेले असता त्यांना मारहाण करून हकलून दिले. इथे यायचे नाही, नाही तर गोळ्या घालू अशी धमकी दिली. त्यानंतर कोतवाली पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दिली. काही पोलिस कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन प्लॉटची पाहणी केली असता दोघेजण प्लॉटची हवारी करीत होते.

त्यांना विचारले असता अक्षय सतीश डाके (रा. नगर), शाहीद शेख (रा. नगर) अशी नावे सांगून स्वाती शरद मोहोळ यांच्य सांगण्यावरून प्लॉटमध्ये घुसल्याचे त्यांनी सांगितले.

त्यामुळे वरील न्यायालयाच्या आदेशाचा भंग करून प्लॉटमध्ये घुसून नासधूस करणे व मारहाण करून जिवे मारण्याची धमक दिल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe