Ahmednagar News : तब्बल बारा वर्षापासून शासकीय नोकऱ्यांमध्ये भरती बंद आहे. राज्यात विविध विभागाच्या अनेक जागा रिक्त आहेत. एकीकडे असे असताना नोकर भरती करणे गरजेचे असताना ते करण्याऐवजी सरकारने गोविंदांना शासकीय नोकरी देणे म्हणजे राज्यातील सर्व बेरोजगारांची केलेली चेष्टाच आहे.
अशी टीका महाराष्ट्र प्रदेश व काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केली आहे. तांबे म्हणाले की, मागील अनेक दिवसांपासून शासकीय नोकऱ्यांमध्ये कोणतीही भरती नाही.

२०१४ आणि आताही राज्यात व केंद्रात भाजपाचे सरकार सत्तेत आले आहे. अनेक दिवस विविध खात्यांमध्ये अनेक जागा हजारो जागा रिक्त आहेत. असे असताना सरकार त्या जागांवर योग्य व्यक्तींची भरती करत नाही.
राज्य सरकारने दहीहंडीला खेळाची मान्यता दिली. हा निर्णय अत्यंत चांगला आहे. परंतु गोविंदांना शासकीय नोकरी सामावून घेणे केलेली घोषणा ही म्हणजे राज्यातील सर्व तमाम बेरोजगारांची मोठी चेष्टाच आहे.
त्यामुळे सरकारने राज्य सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार केला पाहिजे. खरे तर भाजपा सरकारने २०१४ मध्ये देशातील तरुणांना दरवर्षी दोन कोटी नोकऱ्यांचे आमिष दाखवले होते.
मात्र अद्याप कोणतीही भरती झालेली नाही. त्यामुळे तरुणांमध्ये मोठी निराशा निर्माण झाली आहे.विविध तरुण हे गुणवत्तेतून मोठमोठ्या पदव्या मिळत आहेत.
मात्र अद्यापही त्यांना नोकरी मिळत नाही, असे असताना गोविंदा खेळाडूंना शासकीय नोकरी देणे हा निर्णय म्हणजे सर्व बेरोजगारांची मोठी चेष्टाच आहे. तेव्हा या निर्णयाचा महाराष्ट्र सरकारने पुनर्विचार करावा, अशी मागणी ही त्यांनी केली.