‘गटारी’च्या दिवशी शिक्षकांचा रस्त्यावर ‘राडा’, जोरदार हाणामाऱ्या.. अहमदनगरमधील घटना

Ahmednagarlive24 office
Published:
marahan

Ahmednagar News : माझ्या गाडीवर हात ठेवून उभा का राहिलास, या कारणावरुन सुरू झालेल्या वादामध्ये एका युवकाने दोन प्राथमिक शिक्षकांची चांगलीच धुलाई केली. मारामारी सोडविण्यासाठी गेलेल्या तिसऱ्या शिक्षकाच्याही कानशिलात युवकाने दोन लगावल्या.

काही समजायच्या आतच युवकाने तिघेही शिक्षक चांगलेच धुतले. त्यानंतर दोन शिक्षकांनी युवकाला दांडक्याने जबर मारहाण केली. युवक पळाला व वाचला. तेथे एक सामाजिक कार्यकर्ते होते. यांनी मध्यस्थी करून मारामारी थांबविण्याचे काम केले. प्राथमिक शिक्षकांची मारामारी पाहण्यासाठी सेंट्रल बँकेच्या शेजारी शेवगाव रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती.

येथील सेंट्रल बँकेशेजारी एका किराणा दुकानासमोर एक युवक गाडीवर हाथ ठेऊन उभा होता. तीन शिक्षक तेथे आले, त्यापैकी दोघांनी आमची गाडी आहे तू येथे काय करतोस, अशी विचारणा युवकाला केली.

किरकोळ वादावादी झाली. शब्दाने शब्द वाढला आणि युवकाने शिक्षकांना मारायला सुरुवात केली. तिसरा शिक्षक मधे गेला तर त्यालाही दोन कानशिलात युवकाने जोरात मारल्या. सामाजिक कार्यकर्त्याने यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र युवक अतिशय तडफदार होता.

दोन ते तिन मिनीट त्याने शिक्षकांची यथेच्च घुलाई केली. युवक बाजुला गेला. त्यानंतर सावध होत दोन शिक्षकांनी हातात लाकडी दांडके व झाडू घेवुन संबधीत युवकाला शोधले व त्याला जोरदार मारहाण केली. शिक्षकांनी युवकाला बेजार मारले. युवक पळाला म्हणून वाचला.

त्यानंतर युवकाचा कोणीतरी मित्र तेथे आला, त्यालाही शिक्षकांनी चांगलाच चोपला. युवकाचे काही समर्थक माणिकदौंडी रस्त्यावर जमले होते. मात्र, त्यानंतर हा वाद तात्पुरता तरी मिटला आहे.

गटारी अमावस्येच्या दिवशी रविवारी प्राथमिक शिक्षकांचा हा राडा सुमारे पंधरा मिनीट चालू होता. ही मारामारी पाहण्यासाठी सुमारे पन्नास ते शंभर युवकही हजर होते. काहींनी ही मारामारी सोडविली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe