कधी काळी टोमॅटोचे आगर होते अहमदनगरमधील ‘हे’ गाव, परदेशी जायचा माल, आता तेथे टोमॅटो दिसतही नाहीत..

येथील टोमॅटो देशात नव्हे तर परदेशातही जात असे मात्र तो काळ आता पडद्याआड गेला असून सध्या येथील टोमॅटोचे व्यापारीसुद्धा हा व्यवसाय सोडून दुसऱ्या व्यवसायात स्थायिक झाले आहेत.

Pragati
Published:
Tomato rate

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार भगवतीपूर हे काही वर्षांपूर्वी टोमॅटोचे आगार होते. येथील टोमॅटो देशात नव्हे तर परदेशातही जात असे

मात्र तो काळ आता पडद्याआड गेला असून सध्या येथील टोमॅटोचे व्यापारीसुद्धा हा व्यवसाय सोडून दुसऱ्या व्यवसायात स्थायिक झाले आहेत. कधी २०० तर कधी २ रुपये टोमॅटो उत्पादकांना मिळत असल्याने परिसरातील टोमॅटो शेतीही कमी होत आहे.

त्यास केवळ हमीभाव कारणीभूत असल्याचे म्हटले जाते.

दुबार पेरणीचे संकट
८ जूनला मृग नक्षत्र वेळेवर बरसल्याने शेतकरी सुखावला मात्र गत तीन आठवड्यांपासून पावसाने दडी मारली. त्यामुळे प्रवरा परिसरासह राहाता तालुक्यातील शेतकऱ्याच्या नजरा आता अवकाशात रोजच दाटणाऱ्या काळ्या नभाकडे लागल्या आहेत.

मात्र पावसाने दांडी मारल्याने चिंतातुर शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट घोंगवत आहे. दि. ८ जूनला मृग नक्षत्रात जोरदार पाऊस कोसळला; परंतु त्यानंतर पाऊस अक्षरशः रुसला.

हवामान खात्यावर विश्वास ठेवत अनेक शेतकऱ्यांनी मका, सोयाबीन व कपाससारख्या पिकांची पेरणी केली; मात्र हवामान खाते उदंड झाले. काहींचे अंदाज योग्य होते, तर काहींनी वर्तविलेले पावसाचे अंदाज खोटे ठरले.

त्यामुळे शेतकऱ्याने विश्वास कुठल्या हवामान खात्यावर ठेवावा? हा प्रश्नही निर्माण बळीराजाच्या मनात निर्माण होत आहे. मातीत पेरलेले मातीतच जाते की काय? अशी शंका बळीराजा घेत आहे.

शेतीविषयक शासनाचे धोरण शाश्वत नसल्याने त्याचा परिणाम शेती उत्पादनावर होत आहे. लवकर पैसे हाती पडेल, अशा नगदी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल त्यामुळे वाढत आहे. उत्पादनावर आधारित भाव मिळत नाही आणि निसर्गही वेळेवर साथ देत नसल्याने शेतकरी दुहेरी कात्रीत अडकत आहे.

कडधान्य पिकवूनही योग्य मोबदला कृषी उत्पन्न बाजारात मिळेल, याची शाश्वती नसल्याने शेतकऱ्याने याकडे पाठ फिरविल्याचे दिसत असून शेतकरी आता शेती सोबत दुग्ध व्यवसायातही चहुबाजूंनी घेरला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe