कांदा @ 32 ! किती आवक, काय आहे कांदाभावाबाबत स्थिती? पहा..

मध्यंतरी कांदा निर्यातबंदी धोरणामुळे कांद्याचे भाव पडले. शेतकऱ्यांचा खर्चही निघेनासा झाला. त्यामुळे शेतकरी हतबल झाला होता. परंतु आता कांद्याला भाव चांगले भेटू लागले आहेत. कांद्याचे भाव वाढू लागले आहेत

Ahmednagarlive24 office
Published:
Onion News

Ahmednagar News : मध्यंतरी कांदा निर्यातबंदी धोरणामुळे कांद्याचे भाव पडले. शेतकऱ्यांचा खर्चही निघेनासा झाला. त्यामुळे शेतकरी हतबल झाला होता. परंतु आता कांद्याला भाव चांगले भेटू लागले आहेत. कांद्याचे भाव वाढू लागले आहेत.

जवळपास ३० ते ३२ रुपयांपर्यंत कांदा निलाव होत आहेत. त्यामुळे शेतकरी सध्या आपला कांदा मार्केटमध्ये आणत आहे. श्रीरामपूर येथील बाजार समितीच्या कांदा मार्केटमधून मिळालेल्या माहितीनुसार,

बुधवार, दि.१७ रोजी गोणी कांदा मार्केटमध्ये १४ हजार १०० कांदा गोणीची, तसेच मोकळा कांदा लिलाव पद्धतीत ६१ साधनांतून आवक आली होती. गोणीतील कांद्यास सर्वाधिक ३,२०० रुपये, तर मोकळा कांद्यास सर्वाधिक २,९०० रुपये भाव मिळाला. बाजार समितीत गावरान कांदा १४०४५ गोण्या आवक झाली.

गावरान कांदा ३,२०० तर लूज कांद्याला २,९०० रुपये भाव मिळाला. बाजार समितीत गावरान कांदा नं. एक २५०० ते ३२००- कांदा नं. दोन १९०० ते २५००, कांदा नं. तीन १३०० ते १९०० तर गोल्टी कांदा २००० ते २६०० तर खाद कांद्याला ३०० ते १,३०० रुपये भाव मिळाला.

लूज कांदा आवक ६१ वाहनांद्वारे झाली. कांदा नं. एक २७०० ते २९००, कांदा नं. दोन २४०० ते २६५०, कांदा नं. तीन २१५० ते २३५०, गोल्टी कांदा २२००- ते २६०० तर खाद १८०० ते २१००- रुपये मिळाला अशी माहिती समजली आहे.

भाव आणखी चार ते पाच रुपयांनी वाढावेत अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. दरम्यान, दिवाळीपर्यंत कांद्याचे बाजारभाव ४० ते ४५ रुपयांपर्यंत जातील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. त्यामुळे शेतकरी आपला काही कांदा अद्यापही चाळीमध्ये ठेवत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe