कांदा ३४ रुपये ! ४० वर जाण्याची शक्यता, खरेदी प्रक्रियेतही होणार ‘हा’ बदल

कांद्याचे भाव सध्या वाढत असून कांदा साधारण २५ रुपये किलो ते ३४ रुपये किलोपर्यंत विकला जात आहे.कांद्याचे भाव ४० रुपये किलोने पुढे जाण्याची शक्यता व्यापाऱ्याकडून वर्तवली जात आहे.

Ahmednagarlive24 office
Published:
ONION

Ahmednagar News : कांद्याचे भाव सध्या वाढत असून कांदा साधारण २५ रुपये किलो ते ३४ रुपये किलोपर्यंत विकला जात आहे. श्रीरामपूर येथील बाजार समितीत बुधवारी १६ हजार कांदा गोणीची आवक झाली. मोकळा कांदा लिलाव पद्धतीमध्ये ८१ वाहनांतून आवक आली होती.

गोणीतील कांद्यास सर्वाधिक ३४०० तर मोकळ्या कांद्यास २९०५ रुपये सर्वाधिक भाव लिलावामध्ये मिळाला आहे. आवक वाढली असून, बाजारभावही तेजीकडे आहेत. गोणीतील गावरान कांदा प्रथम श्रेणीचा २७०० ते ३४००, द्वितीय श्रेणीचा २००० ते २६५०, तृतीय श्रेणीचा १०५० ते १९५०,

गोल्टी कांदा २००० ते २८०० व खाद कांदा ३०० ते १००० रुपये प्रती क्विंटलने विक्री झाला. मोकळ्या कांद्याला २७०० ते २९२५ दर मिळाले. कांद्याचे भाव वाढते असून, निर्यात खुली झाल्यास दर आणखी वधारतील. कांद्याचे भाव ४० रुपये किलोने पुढे जाण्याची शक्यता व्यापाऱ्याकडून वर्तवली जात आहे.

केंद्राच्या कांदा खरेदी प्रक्रियेत होणार बदल !
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जास्त भाव मिळावा, या उद्देशाने स्थापन झालेल्या ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ या संस्था शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांकडूनच जास्त कांद्याची खरेदी करतात. सद्यस्थितीत शेतकऱ्यांकडून १५ ते २० रुपये किलो दराने खरेदी केलेला कांदा आता व्यापारी ३० रुपयांनी विकत आहेत.

त्यामुळे या दोन संस्थांचा फायदा शेतकऱ्यापेक्षा व्यापाऱ्यांनाच होत असल्याने कांदा खरेदीच्या पद्धतीत बदल करण्याचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या पथकासमोर ठेवला.

शेतकऱ्यांच्या सूचनांप्रमाणे कांदा खरेदी प्रक्रियेत बदल केले जातील. त्यासाठी यासंदर्भातील अहवाल केंद्रीय कृषी मंत्रालयात सादर करण्याचे आश्वासन केंद्रीय पथक प्रमुख बी. के. पृष्टी यांनी दिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe