Ahmednagar news : बोगस ३०२ शेतकऱ्यांच्या नावे सचिवानेच लाटले पावणेदोन कोटीचे कांदा अनुदान ; १६ जणांवर गुन्हा दाखल

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar news : बाजार समितीमध्ये ३०२ शेतकऱ्यांच्या नावे ५३ हजार ८५० क्विंटल कांद्याची बोगस आवक दाखवत १ कोटी ८८ लाख ४७ हजार रुपयांचा कांदा अनुदानाचा बोगस प्रस्ताव तयार करत त्यासंबंधित निधीचा गैरव्यवहार करुन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी श्रीगोंदा बाजार समितीचे सचिव दिलीप डेबरे यांच्यासह आडते व व्यापारी, अशा १६ जणांवर श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सन २०२२-२३ या कालावधीत श्रीगोंदा बाजार समितीमध्ये प्रशासक राज होते. त्यावेळी या समितीचा कारभार प्रशासक म्हणून दिलीप डेबरे हे पाहत होते. या कालावधीत ३०२ शेतकऱ्यांच्या नावावर ५३ हजार ८५० क्विंटल कांद्याची बोगस आवक दाखवत १ कोटी ८८ लाख ४७ हजार ५२४ रुपयांचा अनुदानाचा बोगस प्रस्ताव तयार करुन आणि त्यासंबंधित निधीचा गैरव्यवहार करुन शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे.

यात विशेष म्हणजे अनेकाकांच्या नावावर कांदा दाखवला होता त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांच्या शेतीच्या सातबाऱ्यावर कांदा पिकाची नोंद देखील नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कांदा अनुदानाबाबत सामाजिककार्यकर्ते टिळक भोस यांनी तक्रार केल्याने कांदा अनुदानाची चौकशी होऊन चौकशी अहवालामध्ये यातील ४९५ पैकी ३०२ कांदा अनुदान प्रस्ताव अपात्र व बोगस असल्याचे आढळून येत १ कोटी ८८ लाख ४७ हजार ५२४ रुपयांचे बोगस प्रस्ताव करून कांदा अनुदान लाटण्यात आले असल्याचा अहवाल दिला. याप्रकरणी चौकशी अहवालात दोषी असलेले बाजार समितीचे सचिव दिलीप
डेबरे यांच्यासह आडते/व्यापारी हवालदार ट्रेडिंग कंपनी आणि त्यांचे दिवाणजी, महादेव लोखंडे (रा. चिभळे, ता. श्रीगोंदा), सत्यम ट्रेडर्स, राज ट्रेडर्स, घनश्याम प्रकाश चव्हाण (रा. श्रीगोंदा), शरद झुंबर होले (रा. होलेवस्ती, श्रीगोंदा), संदीप श्रीरंग शिंदे (रा. आढळगाव), राजू भानुदास सातव (रा. श्रीगोंदा), सोपान नारायण सिदनकर (रा. श्रीगोंदा), दत्तात्रेय किसन राऊत(रा. शेडगाव), सिदनकर झुंबर किसन (रा.श्रीगोंदा), शेंडगे संतोष दिलीप (रा. श्रीगोंदा), भाऊ मारुती कोथिंबिरे (रा. साळवण देवी रोड), महेश सुरेश मडके (रा. लोणीव्यंकनाथ, मडकेवाडी) आणि परशुराम गोविंद सोनवणे (रा. टाकळी कडवळीत), यांचा समावेश आहे. यातएकूण एकूण ३०२ शेतकऱ्यांच्या नावावर ५३ हजार ८५० क्विंटल कांद्याची बोगस आवक दाखवत १ कोटी ८८ लाख ४७ हजार ५२४ रुपयांचा अनुदानाचा बोगस प्रस्ताव तयार करुन आणि त्यासंबंधित निधीचा गैरव्यवहार करुन शासनाची फसवणूक केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe