Ahmednagar News : प्रतिकूलतेवर मात करत हर्षला किरण राऊत बनल्या सहाय्यक सहकारी अधिकारी

Published on -

प्रतिकूल परिस्थिती असतानाही जिद्द, चिकाटी आणि कष्टातून तालुक्यातील पिंपळगाव देपा येथील हर्षला किरण राऊत या सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागात सहाय्यक सहकार अधिकारी बनल्या आहेत.

मुलीने अधिकारी व्हावं ही वडिलांची इच्छा त्यांच्या हयातीत पूर्ण होऊ शकली नाही. लग्नानंतर मात्र जिद्दीने हर्षला यांनी वडिलांची इच्छा पूर्ण केली. वडिलांची जागा सासरे प्रकाश राऊत आणि सासू आशाबाई राऊत यांनी घेतली.

मोठ्या धाडसाने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायला लावले. छोटसं बाळ असताना त्यांनी लोकसेवा आयोगाच्या दोन वेळा परीक्षा दिल्या.ऐन परीक्षांच्या वेळी मुलगा आजारी पडल्याने यशाने हर्षला यांना अनेकदा हुलकावणी दिली.

मात्र जिद्द न प्रतिकूलतेवर मात करत त्यांनी अखेर यश मिळविले. कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असताना सातत्याने अभ्यास करून हे यश संपादन केले. आजकाल लग्न झाल्यानंतर सासरी आल्यानंतर सुनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पाहिजे तसा दिसून येत नाही,

मात्र राऊत परिवार याला अपवाद ठरला आहे. सासू, सासरे, पती, दीर यांच्यासह कुटुंबातील सर्वांनी सहकार्य केल्याने आपण यश मिळू शकलो, असे हर्षला यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!