Ahmednagar News : झारखंडची ती.. ‘तो’ संगमनेरचा..इंस्टाग्रामवर प्रेम झालं..याने तिला पैसेही पाठवले..पण त्यानंतर ती व तिचे कुटुंब संगमनेरमला यायला तयार होईनात.. मग हा प्रेमात पागल झाला व पोरीचा बदला घ्यायचं ठरवलं.. त्यानंतर संगमनेरमधीलच एक वयोवृद्ध माणूस हेरला.. नंतर जे झालय ते पाहून तुम्हीही शॉक होऊन जाल.
त्याच झालं असं की, संगमनेर तालुक्यातील झोळे गावात पत्र्यांच्या शेडमध्ये झोपलेल्या ७७ वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीच्या डोक्यात हत्याराने वार करत त्यांचा खून करण्यात आला होता.
ही घटना सोमवारी (दि.५ ऑगस्ट) सकाळी ६ वाजेच्या सुमारास समोर आली. तेथे एक चिठी सापडली व त्यात असं भासवलं होते की हा खून खंडणी देऊन झारखंडच्या कुणीतरी केलाय. त्यानंतर सुरु झालं शोध चक्र अन समोर आली विकृत लव्हस्टोरी.
पोलिसांनी तपास करत गावातीलच २३ वर्षीय युवकाला ताब्यात घेत त्याला अटक केली. भूषण कांताराम वाळे (वय २३, रा. झोळे) असे पोलिसांनी अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटा सारखा बोलू लागला.
त्याची झारखंड येथील एका मुलीशी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली.त्या दोघांत ऑनलाईन प्रेमसंबंध जुळले. त्यांच्यातील ओळखीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले. हे प्रेमप्रकरण ऑनलाईन पद्धतीने होते.
त्याने या मुलीला काही पैसे देखील पाठवले. ते पैसे देऊनही झारखंड मधील ती त्याची प्रेयसी व तिचे वडील लग्नासाठी तयार होईनात. मग याच डोकं फिरलं. तिच्या आई वडीलांचा काटा काढण्यासाठी त्याने विकृत प्लॅन आखला.
आपल्या गावातीलच चौकात असणाऱ्या वृद्ध व्यक्तीचा शोध घेतला व मध्यरात्री त्याने त्याला डोक्यात कुदळीचे घाव घालून ठार केले. त्यानंतर त्या कुटुंबाचा काटा काढण्यासाठी झारखंड येथील मुलीच्या आई वडीलांचे चिट्ठीत हिंदीत नाव लिहून ती चिठ्ठी त्याने दरवाजाला अडकवून दिली.
झारखंडमधील काहींनी खंडणी घेऊन हा खून केल्याचे त्यात नमूद केले होते. दरम्यान पोलिसांनी मयताच्या कुटुंबातील सर्व सदस्य, त्यांचे मित्रपरिवार, त्यांचे नातेवाईक तपासणे, त्याचप्रमाणे घटनास्थळ परिसराकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवरील सीसीटीव्ही तपासणे,
परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणे, घटनास्थळी मिळून आलेल्या चिठ्ठीत नमूद केल्याप्रमाणे झारखंड मधील व्यक्तींची चौकशी सुद्धा पोलिसांनी केली होती.
त्यानंतर सूक्ष्म विश्लेषण केल्यानंतर पोलिसांचा भूषण कांताराम वाळे यावरील संशय बळावला. त्याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने वरील गुन्हा कबूल केला.