अहमदनगरमध्ये ‘येथे’ भूस्खलनाची शक्यता, माळीणसारखी घटना घडू नये यासाठी प्रशासन सतर्क, अनेक कुटुंबांचे स्थलांतर

पावसाळ्यामध्ये काही ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडताना आपण पाहतो. महाराष्ट्राला हादरवणारी माळीणसारखी दुर्घटना ही याचेच उदाहरण. दरम्यान आता पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डोंगराचे भूस्खलनाचा धोका वाढला आहे.

Ahmednagarlive24 office
Published:
mhalungi

Ahmednagar News : पावसाळ्यामध्ये काही ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडताना आपण पाहतो. महाराष्ट्राला हादरवणारी माळीणसारखी दुर्घटना ही याचेच उदाहरण. दरम्यान आता पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डोंगराचे भूस्खलनाचा धोका वाढला आहे.

यामुळे प्रशासन सजग झाले आहे. अकोले तालुक्यातील म्हाळुंगी येथील सोंगाळवाडी व अस्वलेवाडी येथे डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या ४० कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. तशा नोटिसा देखील बजावल्या आहेत.

म्हाळुंगी गावातील सोंगाळवाडी व अस्वलेवाडी येथे जवळपास ४० कुटुंब डोंगराच्या पायथ्याशी राहत आहेत. ग्रामपंचायतीच्या लक्षात आलं की डोंगराचा वरचा भाग हा भुसभुशीत झालाय. त्यामुळे इथे काही घटना घडू शकते अशी शक्यता निर्माण झाल्याने ग्रामविकास अधिकाऱ्याने तातडीने अकोले तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांच्या ही बाब लक्षात आणून दिली.

तसा लेखी अहवाल त्यांनी त्यांना दिला. यानंतर तातडीने तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या बांधकाम विभागाला याचा सर्व्हे करण्याचे आदेश दिले, तातडीने या विभागाचे अधिकारी, कर्मचारी हे देखील या ठिकाणी आले. त्यांनीही या बाबतचा अहवाल दिला.

अतिवृष्टीमुळे डोंगराचे भूस्खलन होण्याची दाट शक्यता असल्याने, प्रशासनाने डोंगरखाली असलेल्या वस्तीचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हाळुंगी परिसरातच कुटुंबाची पर्यायी व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी दिली.

माळीण दुर्घटनेने महाराष्ट्र हादरला होता
माळीण दुर्घटनेने महाराष्ट्र हादरला होता. येथे झालेल्या भूस्खलनाच्या घटनेमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली होती.

आंबेगाव तालुक्यातील माळीण गावातील गावकरी रात्रीपासून कोसळणारा पाऊस कधी थांबतोय याची वाट पाहत असतानाच एकाएकी डोंगरावरून आलेल्या चिखलाच्या प्रचंड लोंढ्यात गाव संपून गेलं होत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe