प्रवरेला पूर ! गावांत पाणी, जायकवाडीकडे सोडला विसर्ग, २४ वर्षात प्रथमच…

गेल्या तीन-चार दिवसांपासून भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भंडारदरा, निळवंडे धरणातून प्रवरा नदीत मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. भंडारदरा धरण भरले असून निळवंडे धरणही भरण्याच्या स्थितीत असल्याने प्रवरा नदीपात्रासह उजव्या व डाव्या कालव्यांमधून पाणी सोडले आहे.

Ahmednagarlive24 office
Published:
water

Ahmednagar News :  गेल्या तीन-चार दिवसांपासून भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भंडारदरा, निळवंडे धरणातून प्रवरा नदीत मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे.

भंडारदरा धरण भरले असून निळवंडे धरणही भरण्याच्या स्थितीत असल्याने प्रवरा नदीपात्रासह उजव्या व डाव्या कालव्यांमधून पाणी सोडले आहे. यंदा पावसाळ्यात प्रथमच संगमनेरमध्ये प्रवरा नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे संगमनेरशहरासह तालुक्यातील धांरदरफळ,

कासारवाडी, जोर्वे, रहिमपूर, ओझर व आश्वी परिसरातील नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला, मात्र गेल्या २४ तासांनंतर अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने वीट भट्ट्यांसह अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेल्याने नुकसान झाले आहे.

आता पाणी जायकवाडी धरणाकडे झेपावले आहे. गुरुवारी भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्यानंतर मोठ्या प्रमाणात निळवंडे धरणात पाण्याचा विसर्ग सुरू होता. शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या मुसळधार पावसामुळे निळवंडे धरणही भरण्याच्या मार्गावर होते.

शनिवारी रात्री सुरू केलेल्या विसर्गामध्ये रविवारी मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आल्याने सोमवारी प्रवरा नदी ठिकठिकाणी दुथडी वाहिली. सकाळी २१ हजार क्युसेकने पाणी सुरू होते. त्यानंतर सातत्याने पाण्यात वाढ झाल्याचे दिसत होते. सायंकाळी अठ्ठावीस हजार क्युसेकने पाणी जायकवाडीकडे झेपावले.

२४ वर्षानंतर पहिल्यांदाच श्रावणात पाणी…
२४ वर्षानंतर पहिल्यांदाच श्रावण महिन्यातील पहिल्या दिवसापासूनच प्रवरा नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आले आहे. त्यामुळे प्रवरातीरी असलेल्या श्री मध्यमेश्वर महादेव मंदिरात सोमवार पहाटेपासूनच ओल्या वस्त्राने स्नान करून जलाभिषेक केला.

निळवंडे उजवा डावा कालव्यांना येणार पाणी !
भंडारदरा परिसरात होत असलेल्या जोरदार पावसामुळे भंडारदरा भरले तर निळवंडे सुध्दा भरण्याच्या स्थितीत असल्याने लवकरचं निळवंडे उजवा- डावा कालव्यांनासुध्दा पाणी येवू शकते.

रविवारी दुपारनंतर प्रवरा नदी पात्रात सोडलेले पाणी थेट नदी काठच्या गावांमध्ये शिरल्याने ऊस, टोमॅटो, बाजरी, सायबीन आदी पिकांसह जोर्वेमधील बहुतांश विटभट्ट्या पाण्याखाली गेल्याने भट्टी मालकांची मोठी ताराबंळ उडाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe