रेशनकार्ड धारकांनी येत्या ३० जूनपर्यंत करून घ्या ‘हे’ काम अन्यथा बंद होतील ‘हे’ लाभ

शिधापत्रिकेतील धान्याचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक सदस्याचे ई-केवायसी प्रमाणिकरण करणे बंधनकारक आहे. ज्यांचे ई-केवायसी प्रमाणिकरण होणार नाही, अशा सदस्यांना धान्य लाभातून वगळले जाणार आहे. म्हणून प्रत्येकाने ई-केवायसी प्रामाणिकरण ३० जून पर्यंत करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी हेमाताई बडे यांनी केले.

Ahmednagarlive24 office
Published:
kupan

Ahmednagar News : शिधापत्रिकेतील धान्याचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक सदस्याचे ई-केवायसी प्रमाणिकरण करणे बंधनकारक आहे. ज्यांचे ई-केवायसी प्रमाणिकरण होणार नाही, अशा सदस्यांना धान्य लाभातून वगळले जाणार आहे. म्हणून प्रत्येकाने ई-केवायसी प्रामाणिकरण ३० जून पर्यंत करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी हेमाताई बडे यांनी केले.

याबाबत येथे नुकत्याच झालेल्या धान्य दुकानदारांच्या बैठकीत जिल्हा पुरवठा अधिकारी बडे बोलत होत्या. यावेळी जिल्हा पुरवठा उप अधिकारी मीनाक्षी चौधरी, नायब तहसीलदार किशोर सानप, पुरवठा निरीक्षक वैशाली गंदीगुडी, पुरवठा कार्यालयातील प्रतिभा दहिफळे, डोळस, ई-पॉज मशीनचे समन्वयक भूषण शिदोरे उपस्थित होते.

याप्रसंगी जिल्हा पुरवठा अधिकारी हेमाताई बडे म्हणाल्या की, धान्य घेत असलेले लाभार्थी सत्य व पात्र असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयात द्यावयाची आहे. त्यानुसार नाशिक विभागाचे आयुक्त डॉ. प्रविण गेडाम, उपायुक्त प्रज्ञा बडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ई-केवायसी प्रामाणिकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे.

स्वस्त धान्य योजनेतील बोगस लाभार्थी शोधणे, पात्र नसताना सरकारच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्याचे लाभ घेणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना वगळताना पात्र लाभार्थी धान्यापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. त्यामुळे ही ई केवायसी प्रमाणिकरण करणे गरजेचे आहे.

त्यामुळे प्रत्येक स्वस्त धान्य दुकानातून प्राधान्य लाभार्थी, अंत्योदय लाभार्थी धान्याचा लाभ घेतात. आशा प्रत्येक सदस्याने ई-केवायसी प्रामाणिकरण ३० जून पर्यंत करणे आवश्यक आहे. ज्यांचे केवायसी प्रामाणिकरण होणार नाही, अशा सदस्यांना धान्य लाभातून वगळले जाणार आहे.

त्यामुळे प्रत्येक सदस्यांनी पात्र सदस्यांनी ई-केवायसी प्रामाणिकरण वेळेत करून घेण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe