Ahmednagar News : खंडणीसाठी मालकाचेच अपहरण करणारा नोकर जेरबंद; नाशिक पोलिसांची शिर्डीत कारवाई

Pragati
Published:

Ahmednagar News : पिस्तूलाचा धाक दाखवित परप्रांतीय व्यापारी राजेशकुमार गुप्ता यांचे अपहरण करून खंडणी प्रकरणातील मुख्य सुत्रधार शिव नेहरकर उर्फ चिक्कु व त्याच्या साथीदाराच्या पोलीसांनी शिर्डीतील साईबाबा मंदिराजवळून अटक केली आहे. या टोळीतील तिघांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून मुख्य सूत्रधारासह त्याचा साथीदार घटनेनंतर फरार होता.  ही कारवाई नाशिक गुन्हे शाखेचे विशेष पथक व शिर्डी पोलीस यांच्या संयुक्त पथकाने केली.

यातील मुख्य सुत्रधार शिव नेहरकर उर्फ चिक्कु हा व्यापारी राजेशकुमार गुप्ता यांच्याच दुकानात कामाला होता, त्यानेच मित्रांच्या मदतीने गुप्ता यांचे अपहरण करून त्यांना मध्यप्रदेशात घेऊन जाऊन १० लाख रूपये खंडणी घेतली होती.

राजेशकुमार गुप्ता (रा. म्हसरुळ) यांचे ४ मार्च २०२४ रोजी म्हसरुळ हद्दीतील सुयोजित गार्डन येथून संशयितांनी अपहरण केले होते. याप्रकरणी संशयितांनी १२ लाखांची खंडणी वसुल केल्यानंतर गुप्ता यांना देवास येथे सोडून दिले होते. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल आहे. दरम्यान, या गुन्ह्यात शहर गुन्हेशाखेने यापूर्वीच तिघांना अटक केलेली आहे. परंतु या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार मात्र पोलिसांच्या हाती लागलेला नव्हता.

दरम्यान व्यापारी राजेशकुमार गुप्ता अपहरण व खंडणी प्रकरणातील मुख्य सुत्रधारासह एकजण शिर्डीत येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या विशेष पथकाचे पोउपनि मुक्तेश्वर लाड व पोअं भगवान जाधव, पोना. भुषण सोनवणे, हे शहरात गस्त करत असतांना त्यांना गुप्त बातमीदाराकडुन मिळाली.

त्यानुसार विशेष पथक शिडी येथे रवाना झाले तसेच शिर्डी पोलिसांच्या मदतीने या आरोपींच्या शोध घेत असतांना आरोपी हे साई मंदिराच्या पाठीमागे पालखी रोडवरील हॉटेल साई संजय येथे आले असल्याची माहिती मिळताच पथकाने शिर्डी पोलीसांच्या मदतीने या हॉटेलवर छापा टाकला.

दोघांना ताब्यात घातले असता त्यांनी त्यांचे नावे शिवा रविंद्र नेहरकर, वय २३ वर्ष, रा. महाजन यांच्या घरात किरायाने, नंदनवन चौक, श्रीस्वामी समर्थ केंद्रा जवल, उत्तम नगर, सिडको, नाशिक, शुभम नानासाहेब खरात, वय २५ वर्ष, रा. संतोषी माता नगर, सयोग रबर कंपणीच्या पाठिमागे, सातपुर MIDC, नाशिक आरोपी असे सांगीतले. त्यांना ताब्यात घेऊन विचारपुस करता वर नमुद गुन्हा केल्यांची कबुली देऊन, गुन्हा केल्यापासुन फरार झाल्याचे सांगितले. दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन गुन्ह्यांचा पुढील तपासकामी म्हसरूल पोलीस ठाणेच्या ताब्यात दिले आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपी मध्ये मुख्य सूत्रधार शिव नेहरकर उर्फ चिक्कु हा असुन तो गुप्ता यांचे दुकानात कामाला होता, शिव यानेच त्यांच्या मित्रांच्या मदतीने अपहरनाचा कट रचला होता.सदरची कामगीरी संदिप कर्णिक (पोलीस आयुक्त) प्रशांत बच्छाव (पोलीस उप आयुक्त गुन्हे), संदिप मिटके (सपोआ गुन्हे), सपोनि ज्ञानेश्वर मोहिते, पोउपनि मुक्तेश्वर लाड, पोउनि दिलीप भोई, पोह. किशोर रोकडे, पोना. दत्ता चकोर, पोना.रविंद्र दिघे, पोना.भुषण सोनवणे, पोअं.भगवान जाधव, पोअं.अनिरूद्ध येवले यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe