सात दरोडेखोरांचा धुमाकूळ, गलोलीद्वारे दगडांचा मारा, लाखोंचा मुद्देमाल लांबवला, अहमदनगरमधील घटना

अहमदनगर जिल्ह्यात अनेक भागात चोरट्यांचा सुळसुळाट सुरु आहे. आता ७ जणांच्या टोळीने चांगलाच धुमाकूळ घातल्याचा प्रकार राहुरीमधून समोर आला आहे. राहुरी शहर हद्दीमध्ये दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत दुकान व दोन घरामध्ये चोरी करीत दहशत निर्माण केली.

Ahmednagarlive24 office
Published:
darodekhor

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात अनेक भागात चोरट्यांचा सुळसुळाट सुरु आहे. आता ७ जणांच्या टोळीने चांगलाच धुमाकूळ घातल्याचा प्रकार राहुरीमधून समोर आला आहे.

राहुरी शहर हद्दीमध्ये दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत दुकान व दोन घरामध्ये चोरी करीत दहशत निर्माण केली. पहाटेच्या वेळी एका व्यक्तीने चोरट्यांच्या टोळीला पाहिले असता आरडाओरडा करताच चोरट्यांनी गलोरीव्दारे दगडाने हल्ला करीत त्यास जखमी केले.

दरोडेखोरांनी एका बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील सुमारे ७५ हजार रुपये रोख रक्कम तसेच तीन ते चार तोळे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाले. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

अज्ञात सात दरोडेखोरांनी पहाटे साडेतीनच्या दरम्यान प्रथम राहुरी शहरातील खाटिक गल्ली येथील किस्मत सुपर शॉपी हे किराणा दुकान फोडण्याचा प्रयत्न केला. तेथेच शेजारी असलेले राजू वायरमन यांचे बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.

त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा मौलाना मुफ्ती अफजल यांच्या घराकडे नेला. दोन दिवसांपासून बंद असलेल्या घरात चोरट्यांनी हातसफाई दाखविली. घरातील सामानाची उचकापाचक केली

आणि घरात असलेल्या कपाटातील तीन ते चार तोळे सोन्याचे दागिने व ७५ हजार रुपये रोख रक्कम घेऊन चोरटे पळून गेले.

घटनेची माहिती देताच पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, सहाय्यक फौजदार तुळशिराम गिते, हवालदार इफ्तीकार सय्यद, पो.ना. संदिप ठाणगे यांनी घटनास्थळी दाखल होत माहिती घेतली. श्वानपथक तसेच ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते.

सीमा नामक वासन मुफ्ती अफजल यांच्या घरापासून ते जामा मस्जिद पर्यंतच घुटमळले. सुमारे तास भर चोरट्यांचा धुडगूस सुरू होता. हा सर्व प्रकार लगतच्या सीसीटिव्ही कॅमेऱ्या कैद झाला आहे.

तरुणावर ‘गलोल’मधून दगडाचा मारा
मौलाना मुफ्ती अफजल यांच्या घरातून दरोडेखोर बाहेर पडले. याच दरम्यान परिसरातील बाबू इकबाल कुरेशी हा तरुण बाहेरगावी जाण्यासाठी घरातून बाहेर पडला असता त्याला दरोडेखोरांची टोळी दिसली.

त्याने आराडाओरडा केला असता दरोडेखोरांनी त्याला गलोल’च्या साहाय्याने दगड मारून जखमी केले. त्यानंतर आरोपी पसार झाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe