Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात या आधी देखील लग्नाचे नाटक करून वधू पैसे घेऊन फरार झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आता आणखी एक डोळे विस्फारायला लावणारी घटना घडली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एक तरुणी अनेकांशी लग्न करतेय आणि धक्कादायक म्हणजे ती त्या सर्वाना लुटून कंगालही करतेय अशी माहिती समजली आहे.
सदर तरुणीने आधी मुळच्या बोधेगावच्या रहिवाशी असलेल्या ठाण्याच्या तरुणाशी लग्न केलं. त्यानंतर देवटाकळीच्या तरुणाला प्रेमाचं खोटं नाटक करून चक्क वीस लाख रुपयांना गंडा घालून तिसऱ्या मुलाबरोबर पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातिल एका तालुक्यातील तरुणी आधी मुळच्या बोधेगावच्या रहिवाशी असलेल्या ठाण्याच्या तरुणाशी केलं लग्र. त्याचे सोन्याची दुकान लुटून पोबारा केला. त्यानंतर देवटाकळीच्या तरुणाला प्रेमाचं खोटं नाटक करून २० लाख रुपयांना गंडा घातला.
याबाबत देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाने तक्रार केली असल्याची माहिती मिळाली आहे. या तरुणीचे लग्न तिच्या आई-बाबांनी खोटी माहिती सांगुन फसवून केली होती. लग्नानंतर त्या मुलीचे भामटे आई-वडिल आणि मुलगी यांनी मिळुन नवरदेव मुलाच्या दिव्यांग आईला आणि नवरदेवाला शारीरिक व मानसिक त्रास देऊ लागले.
अर्धा एकर वावर मुलीच्या नावावर कर नाहीतर तुझ्यावर ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी देऊन देवटाकळी शिवारातील वावर स्वतःच्या नावे त्या भामट्या मुलीने करून घेतले. या फसवणूक झालेल्या तरुणाने त्या मुलीविषयी चौकशी केली असता एका तरुणाशी तिचे पंधरा वर्षे पूर्वीच लग्न झाले होते आणि तिला एक तेरा वर्षांची मुलगी सुद्धा त्या नवऱ्यापासून झाली आहे.
या तरुणाशी लग्न झाल्यानंतर ही मुलगी माझ्या भावाची आहे, अशी खोटी बतावणी करून ती मुलगी स्वतः जवळ ठेवून घेतली. घरात अपंग आई व पाठीशी कुठलेही पाठबळ नसताना या २६ वर्षे तरुणाने त्याच्यापेक्षा वयाने मोठे असलेल्या मुलीशी लग्न केले. तिचा व तिच्या आई-वडिलांचा अत्याचार सहन करत राहिला. परंतु त्याची घोर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने पोलिसांमध्ये धाव घेतली.