धक्कादायक ! खते घेताना शेतकऱ्यांसोबत केले जातेय ‘असे’ काही

रासायनिक खताच्या वाढत्या किंमतीबरोबरच कृषि सेवा केंद्र चालक लिंकिगने खते घेण्याची बळजबरी शेतकऱ्यांना करत असल्याने व गोडाऊनमध्ये पाहीजे त्या कंपनीचा युरीया, १०-२६-२६, १५-१५-१५ ही चांगल्या कंपनीच्या खताची मागणी केल्यास लिंकिंगची बळजबरी करून त्याबरोबर दुसरे खते घेण्यासाठी जाणीवपूर्वक वेठीस धरण्याचे काम सर्रास केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

Pragati
Published:
biyane

Ahmednagar News : ढोरजळगांव व परीसरात नुकत्याच झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी करून सध्या कपाशीच्या अंतर पिकाची मशागत तसेच कपाशीला रासायनिक खताची पेरणी करण्याची लगबग दिसुन येत आहे.

रासायनिक खताच्या वाढत्या किंमतीबरोबरच कृषि सेवा केंद्र चालक लिंकिगने खते घेण्याची बळजबरी शेतकऱ्यांना करत असल्याने व गोडाऊनमध्ये पाहीजे त्या कंपनीचा युरीया, १०-२६-२६, १५-१५-१५ ही चांगल्या कंपनीच्या खताची मागणी केल्यास लिंकिंगची बळजबरी करून त्याबरोबर दुसरे खते घेण्यासाठी जाणीवपूर्वक वेठीस धरण्याचे काम सर्रास केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

या गोष्टीकडे कृषिविभागाने लक्ष दिलेपाहिजे असे शेतकरी म्हणत आहेत. शासनाने खतांच्या दरामध्ये मोठी वाढ केल्याने शेतकरी मेटाकुटीला आला असताना चालू वर्षी पाहीजे ते बियाणे वेळेवर शेतकऱ्यांना मिळु शकले नाही.

बियाणाचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार दिसुन आला. कित्येकांनी ८६४ रूपये किंमतीची कपाशीची पिशवी १२०० ते १५०० रूपये चढ्या भावाने बियाणांची विक्री केली. आता रासायनिक खतामध्ये लिंकिंगचे कारण पुढे करून कृषिसेवा केंद्र चालक इतर खते घेण्यासाठी शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक वेठिस धरत असून

गोडाऊनमध्ये खते उपलब्ध असताना सुध्दा मर्जीतील शेतकऱ्यांना पाहीजे ती खते देऊन अल्पभुधारक शेतकऱ्यांना २ गोण्या खतांसाठी दुसरी १ गोणी खत घेण्यासाठी जाणीवपूर्वक बळजबरी करत असल्याने शेतकऱ्यांना खते उपलब्ध आसताना ते देण्यात टाळाटाळ होत आहे.

ढोरजळगांव परीसरात कृषिसेवा केंद्रात शेतकऱ्यांना पाहिजे असणारी खते उपलब्ध असताना जाणीवपूर्वक लिंकिंगचे कारण पुढे करून खते देण्यात टाळाटाळ केली जात असून काही कृषिसेवा केंद्र चालक जादा दराने खते विक्री करत असून व खताचे बीलही शेतकऱ्यांना देत नाहीत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe