Ahmednagar News : आषाढीवारीसाठी एसटीकडून ‘खास’ नियोजन ! थेट गावात येणार बस, भाविकांनो ‘असा’ घ्या लाभ

Ahmednagarlive24 office
Published:
bus

Ahmednagar News : सध्या वारकऱ्यांची लगबग सुरु झालीये ती आषाढीवारीची. वारकऱ्यांना ओढा लागते ती श्रीक्षेत्र पंढरपूरला जाऊन विठुरायाच्या भेटीची. आता एसटीने देखील वारकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलाय. आषाढी यात्रेनिमित्त राज्यातून ५ हजार विशेष बस सोडण्याचे नियोजन केले गेले आहे.

१३ ते २२ जुलैदरम्यान हा वारकऱ्यांचा यात्रोत्सव असणार आहे. ४० अथवा त्यापेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी जर केली तर थेट त्या गावातून बस उपलब्ध करून दिली जाणार आहे.

थेट गावातून सुविधा
यात्रेचा मुख्य दिवस १७ जुलै आहे. गुरुपौर्णिमा २१ जुलैला आहे. हा दर्शनासाठी पर्वणीचा काळ समजला जातो त्यामुळे भाविक पंढपूरमध्ये मोठी गर्दी करतात. त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी महामंडळाचा हा निर्णय घेतला आहे. यात्रेच्या निमित्ताने थेट गावांतून पंढरपूरला बस उपलब्ध असतील.

राज्य परिवहन महामंडळाच्या अहमदनगर विभागाकडून ही सोय केली जाते. त्यास वारकऱ्यांसह इतर भाविक मोठा प्रतिसाद देतात. भाविकांनी जवळच्या आगारप्रमुखांना भेटून अथवा संपर्क केल्यास आपल्या गावांतून थेट पंढरपूरसाठी स्वतंत्रपणे बस उपलब्ध करून देण्यात येतील. महामंडळाच्या या योजनेमुळे यात्रेकरूंची गैरसोय टळणार आहे.

खेडे गावांतील भाविकांचा प्रवासाची वाट सुलभ होण्यास मदत होईल. याबाबत महामंडळाच्या वतीने योग्य ती दक्षताही घेतली जात आहे. भाविकांनी कोणत्याही अनधिकृत खासगी वाहनांतून प्रवास न करता राज्य परिवहन महामंडळाने उपलब्ध करून दिलेल्या जादा बस सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

मागील वर्षी देखील अशा पद्धतीच्या योजना राबवण्यात आल्या होत्या. यंदाही तीच अपेक्षा महामंडळास आहे. मोठ्या गावांतील सरपंचांना पत्र लिहून महामंडळाने या सुविधेबाबत कळवले असल्याची माहिती समजली आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe