अहमदनगरमध्ये दगडफेक ! एका ठिकाणी एसटीवर तर दुसरीकडे चोरांकडून नागरिकांवर …

हमदनगरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दोन दगडफेकीच्या घटना घडल्या. यातील पहिल्या घटनेत एसटीवर दगडफेक केल्याची घटना बुधवारी (ता. २६) दुपारी तालुक्यातील काष्टी येथे घडली. झाले असे की, श्रीगोंद डेपोची एसटी बुधवारी दुपारी पुण्याहून श्रीगोंद्याकडे येत होती.

Pragati
Published:
st

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दोन दगडफेकीच्या घटना घडल्या. यातील पहिल्या घटनेत एसटीवर दगडफेक केल्याची घटना बुधवारी (ता. २६) दुपारी तालुक्यातील काष्टी येथे घडली. झाले असे की, श्रीगोंद डेपोची एसटी बुधवारी दुपारी पुण्याहून श्रीगोंद्याकडे येत होती.

यावेळी वरवंड (ता. दौंड, जि. पुणे) येथे काही विद्यार्थिनी एसटीत बसल्या. त्यामागे काही तरुणही एसटीत बसले. त्यातील एक तरुण दरवाजात उभा असल्याने वाहकाने त्याला मागे जायला सांगितले. त्यावरून त्याचा वाहकासोबत वाद झाला.

त्यामुळे काही अंतर पुढे आल्यानंतर त्याला एसटीतून उरतवून दिले. याचाच राग येऊन त्या तरुणाने मित्रांसह एसटीचा पाठलाग केला. काष्टी येथील श्रीगोंदे चौकात एसटी आल्यानंतर तिला आडवे थांबून गोंधळ घालीत दगडफेक केल्याची माहिती समजली.

दुसऱ्या घटनेत चोरांकडून दगडफेक
श्रीगोंदे शहरातील शिवाजीनगर येथे ही घटना घडली. या मध्यवस्तीत सेवानिवृत्त अधिकारी असणाऱ्या एकाच्या बंगल्याची खिडकी तोडून घरात प्रवेश करत रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकारामुळे जागे झालेल्या नागरिकांच्या दिशेने दगडफेक करत त्यांनी दहशत माजवली.

पवार यांचे कुटुंबीय बाहेरगावी राहतात. नातेवाइकाच्या लग्नामुळे दोन दिवस आधी या बंगल्यात सोन्याचे दागिने आणून ठेवल्याची माहिती मिळाली. चोरांनी घराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. तो न तुटल्यामुळे खिडकीचे गज कापून बंगल्यात प्रवेश करत डाव साधला.

शिवाजीनगर परिसरातील नागरिक जागे झाले. त्यातील काहींनी चोरांना हटकले असता त्यांनी गलोलीने त्यांच्या दिशेने दगडफेक केली. सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही. त्यानंतर चोरांनी जाताना अनेक लोकांच्या घरांच्या गेटवर टणक वस्तूने आदळआपट करून दहशत माजवली. याबाबतची माहिती समजल्यानंतर पोलीस तेथे गेले, मात्र चोर तोपर्यंत काष्टीच्या दिशेने पसार झाले होते.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe