शारीरिक शोषणाने गाजलेल्या ‘रत्नदीप’ कॉलेज विरोधात आजपासून विद्यार्थ्यांचे पुन्हा आंदोलन, पहा काय घडले..

जामखेड येथील रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ या अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या सर्व शाखा मधिल सर्व विद्यार्थ्यांचे अश्वासन देऊनही इतर कॉलेज मध्ये तात्काळ स्थलांतर झाले नाही.

Pragati
Published:
ratnadip

Ahmednagar News :  जामखेड येथील रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ या अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या सर्व शाखा मधिल सर्व विद्यार्थ्यांचे अश्वासन देऊनही इतर कॉलेज मध्ये तात्काळ स्थलांतर झाले नाही.

त्यामुळे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष पांडुराजे भोसले यांनी पुन्हा गुरूवार (दि. २७) पासून जामखेड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. याबाबत संबंधित मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुराजे भोसले यांच्यासमवेत

तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष भास्कर मोरे याने विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांचे आर्थिक, मानसीक, शारिरीक शोषण करून मोठे नुकसान केले आहे.

त्यासंदर्भात कारवाई करण्यात आली. परंतु त्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे इतर महाविद्यालयात स्थलांतर करण्याचे अश्वासन तीन महीने होऊनही पूर्ण झालेले नाही. विद्यार्थ्यांचा रत्नदीप मेडिकल कॉलेजने वसूल केलेल्या फिस चा प्रश्न, शिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले,

तसेच बी फार्मसी विद्यार्थिनी व्यावसायिक परवाना काढण्यासाठी कॉलेज कडुन आवश्यक ती कागदपत्रे व सह्य शिक्के देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. या सर्व विषयांची विद्यापीठ व प्रशासनाने दखल घेतली नाही यामुळे पांडुराजे भोसले हे विद्यार्थीनसमवेत पुन्हा आमरण उपोषणास बसणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe