१७ वर्षीय तरुणीची आत्महत्या

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : तालूक्यातील चंडकापूर येथील एका सतरा वर्षीय कॉलेज तरुणीने तिच्या राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल शुक्रवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी घडली.

याबाबत पोलिसांनी सांगितले, की ही तरुणी राहुरी तालुक्यातील चंडकापूर येथे तिच्या कुटुंबासह राहात होती.

ती बारावीच्या वर्गात शिक्षण घेत असून काल तिचा दुसरा पेपर होता. काल सकाळी नऊ वाजेच्या सुमारास तीने राहत्या घरात पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपवली. तिच्या पश्चात आई-वडील,

आजी, लहान भाऊ व चुलते असा परिवार आहे. तिचे राहुरी येथे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी तिचे नातेवाईक उपस्थित होते.

आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या घटनेबाबत राहुरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली.

तसेच पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. या घटनेमुळे चंडकापूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe