तरुणाची आत्महत्या, तीन महिलांसह सहा जणांना पाच वर्ष सक्तमजूरी, काय होत प्रकरण? पहा..

तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात तीन महिला व तीन पुरुष, अशा सहा जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Ahmednagarlive24 office
Published:
court

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे एका तरुणाने तीन वर्षापूर्वी आत्महत्या केल्याची घडना घडली होती. याप्रकरणी राहुरी तालुक्यातील सहा जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर खटला अहमदनगर येथील जिल्हा न्यायालयात चालला.

अखेर मंगळवारी (दि.२५) या प्रकरणातील सहा आरोपींना जिल्हा न्यायालयाने पाच वर्ष सक्त मजूरीची शिक्षा सुनावली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे सन २०२१ मध्ये रोहित कचरु लांडगे या तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती.

या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात तीन महिला व तीन पुरुष, अशा सहा जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यावेळी आरोपींना अटक होऊन न्यायालयाकडून तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आला होता. दरम्यान, राहुरी पोलिसांकडून या घटनेचा तपास पूर्ण करून अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला. त्यानंतर सदर खटला अहमदनगर येथील जिल्हा न्यायालयात सुरु होता.

न्यायालयाकडून साक्षीदार व पंचांचे जबाब घेण्यात आले. फिर्यादीकडून सरकारी वकील यांनी भक्कम अशी बाजू मांडली. तर आरोपींच्या वकिलाने बचावासाठी बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून साक्षीदार, पंच व पुराव्याच्या आधारावर मंगळवारी (दि.२५) या खटल्याचा निकाल दिला.

यामध्ये आरोपी बिदूबाई मारुती सिंगारे, सिमा रावसाहेब बोरुडे, छकूल्या ऊर्फ सतिष रावसाहेब बोरुडे, शिवानी रोहित लांडगे, मोईन अमीर शेख, शरद राजाराम शिंदे (सर्व, रा. डिग्रस, ता. राहुरी) या सहा आरोपींना जिल्हा न्यायालयाने दोषी ठरविले.

आणि आरोपींना पाच वर्ष सक्त मजूरी शिक्षा सुनावली आहे. पोलीस पथकाने तात्काळ सर्व सहा आरोपींना न्यायालयाच्या आवारातच ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची नाशिक येथील सेंट्रल जेलमध्ये रवानगी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe