Ahmednagar News : प्रसिद्ध क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याचे आकर्षक स्ट्रेट ड्राईव्ह मारतानाचे २२ फुटी शिल्प मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर आहे. हे जगप्रसिद्ध झालेले शिल्प अहमदनगर जिल्ह्यातील दिग्गज कलाकाराने बनवले आहे.
प्रमोद कांबळे या दिग्गज शिल्पकाराने हे शिल्प साकारलं आहे. वानखेडे स्टेडियममध्ये बीसीसीआयच्या निर्देशानुसार प्रमोद कांबळे यांनी सचिन तेंडुलकरचे शिल्प साकारले आहे. या २२ फुटी शिल्पाचे जगभरातून कौतुक झाले. या अप्रतिम शिल्पकृतीच्या १०० रिप्लिका बीसीसीआयने भेट म्हणून देण्यासाठी
कांबळेंकडून तयार करून घेतल्या. त्यानंतर आता प्रमोद कांबळे यांनीही या रिप्लिका अहमदनगरमधील क्रिकेटप्रेमी आणि दिग्गजांना भेट म्हणून देण्याचे ठरवले आहे. आजवर प्रमोद कांबळे यांनी अनेक शिल्पकृती साकारल्या व ज्या देशोदेशी वाखाणल्या गेल्या.
त्यांना त्यांच्या या कलेसाठी आजवर अनेक पुरस्कारांनीही गौरवले गेले आहे. यावेळी बोलताना पोपटराव पवार यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. मला ग्रामविकासात मिळालेले यश हे क्रिकेटमुळे मिळालेले असून या क्रिकेटचा देव असलेल्या सचिन तेंडुलकर यांच्या २२ फुटी पुतळ्याची छोटीशी प्रतिकृती मिळाल्यामुळे आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले.
नरेंद्र फिरोदिया म्हणाले, अहमदनगरमधील एका शिल्पकाराने तयार केलेले शिल्प आज जगभरात नावाजले जाते, याचा मला सार्थ अभिमान आहे. तर त्यावेळी भावना व्यक्त करताना कोहिनूर उद्योग समूहाचे संचालक अश्विन गांधी म्हणाले, भारतातल्या फक्त १०० लोकांकडे ही प्रतिकृती आहे आणि त्यापैकी मी एक आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतोय.
पुतळ्याची विशेषतः
सचिन तेंडुलकरचा हा पुतळा कास्यापासून (ब्रांझ) तयार करण्यात आला आहे. मुख्य पुतळा आहेत्याची उंची 10 फूट आहे. त्याच्या हातात जी बॅट आहे ती तब्बल चार फूट आहे.
असे मिळून झाले चौदा फूट. त्याखाली जगाचे चिन्ह म्हणून क्रिकेटचा चेंडू साकारण्यात आलेला असून सचिन रमेश तेंडुलकर असे पूर्ण नाव त्या चेंडूवर कोरण्यात आलेले आहे. असे एकूण 22 फुटाचे हे शिल्प साकारले गेलेय.