Ahmednagar News : नवनागापुर येथील आंधळे चौकात अविनाश मिरपगार व त्यांची पत्नी फोनवर व्हिडीओ कॉल करुन बोलत असताना हा आपलाच व्हिडिओ काढत असल्याच्या संशयावरून अविनाश मिरपगार यांचा सिमेंटचे ब्लॉक डोक्यात मारून खून करण्यात आला होता. याप्रकरणी पसार असलेला
किरण बाळासाहेब गव्हाणे हा त्याच्या राहत्या घरी आला असता त्यास पोलिसांनी जेरबंद केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी , अविनाश मिरपगार व त्याची पत्नी काजल मिरपगार हे ४ जून रोजी व्हिडिओ कॉलवरून बोलत होते. त्यांचे बोलणे सुरू असताना तो आपले शूटिंग करत आहे, असा संशय आल्याने . ‘तू आमचा व्हिडिओ का काढतोस’, असे म्हणत शिवीगाळ करत चौघांनी त्याला तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच सिमेंटचे ब्लॉक डोक्यात मारून त्याचा खून केला होता. तिघांना या पूर्वीच अटक केली होती. मात्र किरण बाळासाहेब गव्हाणे हा पसार झाला होता.

दरम्यान पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्याकडे तपास देण्यात आला होता. त्यानुसार पोलिस निरीक्षक आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि.तुषार धाकराव व अंमलदार दत्तात्रय गव्हाणे, रविंद्र कर्डीले, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप दरदंले, देवेंद्र शेलार, फुरकान शेख व मेघराज कोल्हे यांचे पथक रवाना केले.
या पथकातील अधिकारी कर्मचारी तांत्रिक विश्लेषणाचे आधारे पसार आरोपीचा शोध घेत असतांना पथकास गुप्तबातमीदारा मार्फत पसार आरोपी किरण गव्हाणे हा त्यांच्या राहत्या घरी आला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथका या परिसरात तपास केला असता. त्यांना बातमीतील वर्णना प्रमाणे एक इसम मिळुन आल्याने त्यास शिताफीने ताब्यात घेतले.
त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव किरण बाळासाहेग गव्हाणे (वय २६, रा. शनिशिंगणापुर, ता. नेवासा) असे असल्याचे सांगितले. त्याच्याकडे वरील गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याचे सांगितल्याने त्यास ताब्यात घेवुन एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशन करीत आहेत .













