Ahmednagar News : लोकसभेत महायुतीला ‘या’ गोष्टींचा बसला फटका ; मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : नुकतीच लोकसभा निवडणुक पार पडली. राज्यात महायुतीला अवघ्या १७ जागांवर मजल मारता आली. यातील अनेक ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांचा धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. या अनपेक्षित निकालाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निवडणुकीत कोणत्या कारणांचा फटका बसला याबाबत स्पष्टोक्ती दिली. लोकसभा निवडणुकीत प्रामुख्याने विरोधकांनी केलेला संविधान बदलाचा अपप्रचार, आरक्षण संपवण्याच्या चर्चा, त्यातच परत कांद्यासह सोयाबीन, कापसाचे मोठ्या काळापासून गडगडले भाव या गोष्टीचाही मतदानावर चांगलाच परिणाम झाला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान सह्याद्री अतिथीगृहात शेतपिकासाठी किमान आधारभूत किंमत निश्चिती करण्यासाठी केंद्रीय कृषिमूल्य आणि किंमत आयोगाची बैठक आयोजित केली होती . यावेळी बोलताना मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी विविध मुद्यांवर चांगलीच चुकीची चर्चा घडवून आणली, यात प्रामुख्याने राज्यातील संविधान बदलाचा अपप्रचार, आरक्षण संपवण्याची चर्चा आदींमुळे महायुतीला अनेक जागा यामुळे गमवाव्या लागल्या. तसेच निवडणुकीपूर्वी करण्यात आलेल्या ४०० पार या घोषणेमुळे जर ही घोषणा खरी ठरली तर काहीतरी गडबड होईल, या भीतीने देखील अनेक लोकांनी महायुतीला मतदान केले नाही. शिवाय एकीकडे कांद्याचे पडलेले भाव, दूध दारात करण्यात आलेली कपात अन दुसरीकडे वाढलेले पशुखाद्याचे भाव या गोष्टीमुळे आधीच नाराज असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांनीही विरोधात मत दिल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत विशेषकरून प्रामुख्याने नाशिक पट्ट्यात तर कांद्याने आम्हाला रडवलेच कांद्याची निर्यात बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांना स्थनिक बाजारपेठेत कांदा कवडीमोल दराने विकावा लागला. यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले, त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचा सरकारवर रोष होता. तर कपाशीमुळे मराठवाडा आणि विदर्भात त्रास झाला. दरम्यान सोयाबीन, कपाशी आणि कांदा यांच्या निर्यातीवर आम्ही पंतप्रधानांशी चर्चा केली आहे. कपाशीला किमान आधारभूत किंमत तरी मिळाली पाहिजे, अशी भूमिका घेतल्याचे शिंदे यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe