Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरातील एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीला भिक्षा मागण्यासाठी आलेल्या भोंदू तरुणाने जवळ ओढून तिला लाज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी बाप व मुलगा असलेल्या दोघाभोंदू बाबांची यथेच्छ धुलाई केली.
त्या नंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात तेरा वर्षीय मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार नारायण आप्पा जाधव (राहणार बाबर नगर, पैठण नाका, अंबड जि. जालना) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेतील पिडीत १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही देवळाली प्रवरा परिसरात तीच्या कुटुंबासह राहते. सकाळी दहा वाजे दरम्यान पिडीत मुलगी तीच्या घरात एकटीच होती. त्यावेळी बाप व मुलगा असलेले दोन भोंदू बाबा भिक्षा मागण्यासाठी आले.
त्यांनी पाणी पिण्यासाठी मागून तिच्या घरी कोणी नाही हे पाहून मी थोडावेळ घरात बसतो असे सांगितले. त्याने बसण्यासाठी चटई मागीतली. त्यास बसण्यासाठी चटई दिली व त्यानंतर त्याने तुमचे ग्रहमाण फिरलेले आहे, मी तुला एक वस्तु देतो “असे सांगुन सदर मुलीला बोलावुन हात धरुन त्याचेजवळ ओढुन मिठी मारली.
त्यानंतर तीला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. पिडीत मुलीने आरडाओरडा केला असता भोंदू बाबांनी तेथून पळ काढला. परिसरातील काही तरुणांनी दोन्ही भोंदू बाबांना पकडून त्यांची यथेच्छ धुलाई केली. दरम्यान या आरोपीस आरोपीला १४ दिवस न्यायालयीन कोठडी मिळाली असल्याचे समजले आहे. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पडोळे है करत आहे.