परिस्थिती बेताची, सगळीच भ्रांत, तरीही..! यंदा अहमदनगरमधील अनेक विद्यार्थी झालेत अधिकारी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध परीक्षा घेण्यात येतात. एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत अहमदनगरमधील ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांनी आपला डंका वाजवला.

Ahmednagarlive24 office
Published:
mpsc

Ahmednagar News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध परीक्षा घेण्यात येतात. एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत अहमदनगरमधील ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांनी आपला डंका वाजवला.

कुणी टेम्पोचालकाचा तर कुणी शेतकऱ्याचा मुलगा, पण खडतर प्रयत्न, अपुऱ्या सोयी-सुविधांवर मात करत या विद्यार्थ्यांनी यश मिळवलंय. खडतर मार्गावर चालणाऱ्या व बऱ्याचदा निराश होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे विद्यार्थी आदर्श ठरतायेत.

पालिकेच्या अभ्यासिकेत अभ्यास.. दोघांचे घवघवीत यश
सामान्य कुटुंबातील शुभम ठोकळे आणि अंकुश साळवे या तरुणांनी राहुरी नगरपालिकेच्या अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत शासकीय नोकरीत यश मिळवले आहे. त्यांच्या या यशाचे राहुरी शहरातून कौतुक होत आहे.

राहुरी शहरातील क्रांती चौक येथे राहणाऱ्या अंकुश सुरेश साळवे याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक सात मध्ये एस आर पी एफ मध्ये त्याची निवड झाली आहे.

तर बुवासिंधबाबा गल्लीतील शुभम शिवाजी ठोकळे याची अहमदनगर जिल्हा पोलीस दलामध्ये चालक म्हणून निवड नुकतीच झाली आहे.

शेतकऱ्याचा मुलगा पोलिस उपनिरीक्षक
राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा येथील शेतकरी कुटुंबातील नितीन सुरेश शिंदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाली. शेतकरी कुटुंबातील तरुणाची निवड झाल्याने ग्रामस्थांनी मिरवणूक काढत नितीनचा सत्कार करण्यात आला.

टेम्पोचालकाची मुलगी पोलीस अधिकारी
जिद्द आणि परिश्रम घेण्याची तयारी असली की, कठीण परिस्थितीवर मात करून यशाला गवसणी घालता येते. अशीच राहुरी तालुक्यातील म्हैसगाव (आग्रेवाडी) येथील काजल मच्छिंद्र आग्रे हिने अतिशय खडतर प्रयत्नातून पोलीस उपनिरीक्षक पद मिळविले.

तिची घरची परिस्थिती बेताची असून शेती मुळा धरणात संपादित झाल्याने कुटूंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी वडील टेम्पो चालवतात. मुळा नदीच्या पायथ्याशी असलेल्या म्हैसगाव (आग्रेवाडी) मध्ये काजलचा जन्म एका सर्वसामान्य कुटुंबात झाला,

वडील मच्छिंद्र आग्रे. शेती मुळा धरणात संपादित झाल्याने कुटूंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी वडील टेम्पो चालवत संसाराचा गाडा हाकत आहे. काजल ही लहानपणापासून हुशार, जिद्दी, अभ्यासू आणि जिज्ञासू वृत्तीची मुलगी असून गावात मुलींमध्ये प्रथम महिला पीएसआय होण्याचा मान तिने मिळविला आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe