Ahmednagar News : अहमदनगरमधील तरुणाई अडकतेय ‘या’ नव्या नशेच्या विळख्यात, ‘तो’ पदार्थ प्रतिबंधित नसल्याने पोलिसांनाही कारवाई करता येईना, पालकांनो सावधान..

Published on -

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील तरुणाई बाबत विचार करायला लावणारे एक वास्तव समोर आल्याची चर्चा आहे. जिल्ह्यातील अनेक तरुण व्हाइटनरचे व्यसन करण्याच्या विळख्यात अडकले आहेत.

धकाकदायक बाब अशी आहे की व्हाईट्नर हे प्रतिबंधित नसल्याने नशेसाठी वापरणारांवर कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता युवकांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली असून, यासाठी युवकांमध्ये जनजागृतीची गरज आहे.

जिल्ह्यात हजारो तरुणांसह अल्पवयीन मुले या नशेच्या आहारी गेले असल्याची चर्चा आहे. हातरुमालावर व्हाइटनर लावून त्याच्या गंधातून ही नशा केली जाते. दरम्यान, कोरोना काळापासून व्हाइटनरच्या नशेचे प्रमाण तरुणांसह अल्पवयीन मुलांत वाढले आहे.

या प्रकारात व्हाइटनर आणि झंडू बामचा वापर केला जात असल्याचे बोलले जाते. व्हाइटनर हे सर्वसाधारणपणे कोणत्याही जनरल स्टोअर्समध्ये सहज उपलब्ध होत असल्याने नशेचा प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अशा प्रकारे व्यसन करणाऱ्या युवकांची संख्या दिवसेंदिवस वाढ़त आहे.

काही भागात तर ब्रेडवर बाम लावून तो खाण्याचा प्रकारही वाढला असल्याचे बोलले जात आहे. पालक आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचेही या प्रकाराकडे होत असलेले दुर्लक्ष तरुणांसह अल्पवयीन मुलांच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे. सर्वानीच याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

आरोग्यावर परिणाम
व्हाईटनर हे ऑरगॅनिक द्रावण आहे. डायक्लोरो, इथिलीन व बेंझीनचे मोठे प्रमाण असल्याने त्याचा वास उग्र स्वरूपाचा असतो. या नशेमुळे मानसिक संतुलन बिघडणे, झोप न येणे, झटके येणे, बेशुद्ध पडणे, हृदयविकाराचा झटका येणे हे आजार उद्भवू शकतात, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.

मुपदेशनाची गरज
व्हाइटनर जनरल स्टोअर्समध्ये सहज मिळणारा द्रवपदार्थ आहे. ते प्रतिबंधित नसल्याने नशेसाठी वापरणारांवर कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना नाहीत. त्यामुळे व्यसनी तरुणांच्या समुपदेशनाची गरज आहे असाही एक मतप्रवाह आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe