फलके फार्म हॉटेल मालकाच्या घरावर भरदिवसा चोरट्यांचा घाला, ‘इतकी’ रक्कम लांबवली

हॉटेल व्यावसायिकाचे घर चोरट्यांनी भरदिवसा फोडून सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कम असा सुमारे ४ लाख १० हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि.२६) सकाळी १० ते दुपारी १.४५ या कालावधीत नगर तालुक्यातील चास शिवारात घडली.

Pragati
Published:
chor

Ahmednagar News : हॉटेल व्यावसायिकाचे घर चोरट्यांनी भरदिवसा फोडून सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कम असा सुमारे ४ लाख १० हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि.२६) सकाळी १० ते दुपारी १.४५ या कालावधीत नगर तालुक्यातील चास शिवारात घडली.

भरदुपारी ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. नगर – पुणे महामार्गावर चास शिवारात असलेल्या फलके फार्म या हॉटेलच्या मालकांच्या घरी ही घरफोडी झाली आहे. याबाबत अंबादास विश्वनाथ फलके (वय ५७, रा. चास शिवार, ता. नगर) यांनी याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फलके यांचे चास शिवारात महामार्गालगत हॉटेल असून त्याच्या समोरील बाजूस चास ते भोरवाडी जाणाऱ्या रस्त्यावर घर आहे. बुधवारी (दि.२६) सकाळी १० ते दुपारी २ या कालावधीत घरातील सर्वजण हॉटेलवर कामात मग्न असताना

आणि पावसाची रिपरिप सुरु असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरात उचकापाचक करत घरातील कपाटाचे लॉक तोडून त्यात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली.

दुपारी २ च्या सुमारास चोरीची ही घटना निदर्शनास आल्यावर फलके यांनी नगर तालुका पोलिसांना घटनेची माहिती दिली. ही माहिती मिळताच नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक संपतराव भोसले, नगर तालुका पोलिस ठाण्याचे स.पो.नि. प्रल्हाद गिते यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

या प्रकरणी फलके यांच्या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक रणजीत मारग करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe