Ahmednagar News : ज्यांनी घरे फोडली, त्यांचेच घर फुटले : आमदार राम शिंदे

Published on -

ज्यांनी घरे फोडली त्यांचेच घर फुटले, ज्यांनी पाप केले त्यांनाच ते फेडावे लागते. आता न्याय इथच आहे, मी कधी देखावा केला नाही, काम केले, आता हे जनतेला पटले आहे, अशी खरमरीत टिका आमदार राम शिंदे यांनी आ. रोहित पवार यांच्यावर त्यांचे नाव न घेता केली.

कर्जत तालुक्‍यातील आंबिजळगांव येथे सद्गुरु उद्योग समूहाचा नवीन उपक्रम त्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी आ.राम शिंदे बोलत होते. ते पुढे म्हणाले, पक्षाने संधी दिली त्याला मी न्याय दिला,

पालकमंत्री असताना अनेक कामे मार्गी लावली, जलयुक्‍त शिवारच्या दर्जेदार कामामुळे गेल्या पाच वर्षांत टँकर लागले नाहीत, कर्जतला भीषण पाणी टंचाई होती. याचा आम्ही देखावा केला नाही,

गेले तीन वर्षे कुकडीचे पाणी नव्हते ते आता सुरळीत केले, यामुळे शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला, तुकाई उपसा सिंचन योजनेचा प्रश्‍न मार्गी लावला, राशीन चापडगाव हा रस्ता केला. तो आता कुठय तेच कळत नाही,

रस्ता गावाला झाला पण सजा मला मिळाली, कर्जत तालुक्‍यात माझा एक गुंठा नाही, मी आठ वर्षांत घर बांधले, त्याची चर्चा झाली, त्यांनी अडीच वर्षांत बंगला बांधला त्याची चर्चाच नाही, हे सर्व जनतेच्या लक्षात आले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe