Ahmednagar News : पैसे देण्याच्या कारणावरून अमोल रेवडकर व आशिष खांबट (रा. वरुर), यांना महेश बाळासाहेब काटे रा. आखेगाव याने काहीतरी धारदार शस्त्राने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना हॉटेल राजयोग समोर पाथर्डी येथे शेवगाव रस्त्यावर घडली.
याबाबत पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. महेश काटे याला अटक करुन न्यायालयासमोर हजर केले असता, २७ जुनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अमोल रेवडकर व आशिष खांबट हे वरुर येथील राहणारे आहेत. महेश बाळासाहेब काटे यांच्या ते ओळखीचे आहेत. तिघेजण पाथर्डीत हॉटेल राजयोगच्यासमोर उभे होते. बोलताना वाद झाला.

महेश काटे याने रेवडकर व खांबट यांना एक लाख रुपये मागितले, पैसे देत नाही, याचा राग धरुन महेश काटे याने खिशातुन काहीतरी धारदार शस्त्राने सपासप वार केले. रेवडकर व खांबट यांनी काटेचा पाठलागही केला, कोणाला काही समजायच्या आत काटे पसार झाला. मात्र, जमावातील काहींनी महेश काटे याला पकडले. पोलिसही घटनास्थळी तातडीने आले.
राहुल खांबट याने पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. अमोल रेवटकर हा गंभीर जखमी असल्याने त्याला व खांबट याला उपचारासाठी नगरला दवाखान्यात पाठविले आहे. अमोल रेवटकर याची प्रकृती अधिक गंभीर आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. पोलिसांनी महेश काटे याला अटक करून येथील न्यायाधीशांसमोर उभे केले.
तपाशी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सचिन लिमकर यांनी न्यालयाकडे सात दिवसाची पोलिस कोठडी मागितली. न्यायाधीशांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत २७ जुनपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.