अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात दोन गावे वाढली, वाड्यांना महसुली दर्जा

Pragati
Published:
ahmednagar

Ahmednagar News : अकोले तालुक्यातील दोन वाड्यांना महसुली दर्जा प्राप्त होऊन दोन नवीन गावे झाली आहेत. तालुक्यात दोन गावे वाढल्याने अकोले तालुका १९१ ऐवजी आता १९३ गावांचा तालुका झाला आहे.

अकोले तालुक्यातील देवठाण येथील वरखडवाडी व दोडकनदी या दोन वाड्यांचा गाव म्हणून महसुली दर्जा प्राप्त व्हावा, यासाठी जमाबंदी आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव होता.

त्यावर जमाबंदी आयुक्त यांच्या आदेशाने तालुका भुमिलेख कार्यालयाने देवठाणच्या वरखडवाडी व दोडकनदी या दोन वाड्यांना महसुली गावाचा दर्जा देण्यात आल्याचा आदेश पारीत करुन यावर स्वतंत्र आकार बंद तयार होऊन गावांना वहिवाट लागू केली आहे.

अकोले तालुक्यात आतापर्यंत १९१ गावे होती त्यात आता या दोन नविन गावांचा समावेश झाल्याने अकोले तालुक्यात एकुण १९३ गावे झाली आहेत. अकोले तालुक्यातील देवठाण येथील वरखडवाडी व दोडकनदी या दोन वाड्यांचा प्रस्ताव जमाबंदी आयुक्ताकडे होता.

त्यावर आदेश पारित होऊन वरखडवाडी व दोडकनदी या वाड्यांना महसुली गावाचा दर्जा प्राप्त झाला असल्याने आता तालुक्यातील गावांची संख्या १९३ झाली आहे अशी माहिती नायब तहसीलदारांनी दिली आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe