Ahmednagar News : भाजीपाल्याची अवाक मंदावली ; टोमॅटो ५०, बटाटा ४०, गवार, दोडके, मिरची १२० रुपये किलो

Pragati
Published:

Ahmednagar News : पावसाळा सुरु झाल्याने मोठ्या प्रमाणात भाज्यांची आवक कमी झाल्याने भाज्यांचे दर वाढले आहेत.  पावसामुळे अनेक भाज्या शेतातच खराब होतात. तो खराब माल फेकून द्यावा लागतो. त्यामुळे या काळात नुकसान जास्त होत असल्याने अनेकजण भाजीपाल्याचे उत्पादन घेत नाहीत.

सततच्या पावसाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांची आवक देखील कमी झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मागील काही दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे भाज्यांच्या अवकेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे टोमॅटोचे दर पाचपटीने तर रोज वापरात असलेल्या कांद्याचे दर देखील दुपटीने वाढले आहेत.

या आधी टोमॅटो १० रुपये किलो असे विकले जात होते, परंतु ते आता ५० रुपये प्रतिकिलोने मिळत आहेत. कांदाही २० रुपयांवरून ४० रुपयांवर गेला आहे. त्याचसोबत मिरची, कोबी, गवार, तसेच इतर पालेभाज्यांचे दरही दीडपट ते दुपटीने वाढले आहेत.

मागील आठवड्यात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची पेरण्यांसाठी लगबग सुरूआहे. त्यामुळे शेतकरी बाजारात भाजीपाला विक्री करण्यासाठी कमी आले, तसेच पावसाने शेतात असलेला भाजीपाला काढणे शक्य झाले नाही. परिणामी आवक कमी झाल्याने भाज्या महाग झाल्याचे दिसत आहे. मेथी, पालक अशा पालेभाज्यांची जुडी १० रुपयांवरून ३० रुपयांपर्यंत गेली आहे.

भाजीपाल्याला सध्या मिळत असलेले भाव (प्रतिकिलो)
टोमॅटो ५०, कांदा ४०, बटाटा ४०, गवार १२०, दोडके १२०, मिरची १२०, शिमला मिरची ८०, भेंडी ८०, दुधी भोपळा १२०, कोबी ८० , मेथी, पालक ३० रुपये जुडी.

नगर बाजार समितीत मिळालेले दर ( क्विंटलप्रमाणे ) : टोमॅटो १००० – ५५००, वांगी १००० – ४०००, फ्लावर १००० – ६०००, कोबी ५०० – २२००, काकडी ५०० – ३०००, गवार ४००० – ९०००, घोसाळे २००० – ५०००, दोडका ३००० – ७०००, कारले ३००० – ७०००, भेंडी २००० – ६०००, घेवडा १६००० – १८०००, बटाटे २००० – ३०००, लसूण ८००० – १८०००, हिरवी मिरची ३००० – ७०००, शेवगा ५००० – ९०००, भु. शेंग ३००० – ५५०००, लिंबू ४००० – ६५००, गाजर १५०० – २५००, दू. भोपळा ५०० – २०००, शि. मिरची २५०० – ५५००, मेथी १००० – २०००, कोथंबीर २४०० – ४५००, पालक१००० – २०००, शेपू भाजी २००० – ३०००, चवळी ४००० – ६०००, बीट २००० – ३०००.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe