Ahmednagar News : हरियाणातील विजय आत्मविश्वास वाढवणारा : मंत्री विखे

Ahmednagarlive24 office
Published:

हरीयाणा राज्यात भारतीय जनता पक्षाला मिळालेला विजय आत्मविश्वास वाढविणारा असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील जनता विकासाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहात असल्याचा संदेश या निकालाने दिला असल्याची प्रतिक्रीया महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केली.

हरीयाणा राज्यात सलग तिसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष मंत्री जे. पी नड्डा आणि हरीयाणामधील सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून मंत्री विखे पाटील म्हणाले की, लोकसभेमध्ये फेक नॅरेटिव्हचा उपयोग करून विरोधकांनी निर्माण केलेल्या वातावरणाला हरीयाणाच्या निकालाने चपराक दिली आहे.

देशातील जनता खोट्या प्रचाराच्या नव्हे तर विकासाच्या मागे उभी राहाते या विजयाने दाखवून दिले आहे.हरीयाणामध्ये निवडणुकीच्या आधी अग्निवीर योजनेच्या विरोधात जाणीवपुर्वक वातावरण निर्माण केले गेले. खेळाडुंना पुढे करून राजकारण करून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला.

या सर्व घटनांना हरीयाणातील जनतेने मतदानातून नाकारले आणि भारतीय जनता पक्षाच्या विकासाच्या राजकारणाला पाठबळ दिले असल्याकडे मंत्री विखे पाटील यांनी लक्ष वेधले.जम्मू काश्मिरमध्ये पुन्हा एकदा लोकशाही प्रक्रीयेला या निवडणुकीच्या निमिताने बळकटी मिळाली असून, अतिशय भयमुक्त वातावरणात निवडणूक प्रक्रीया पार पाडल्याचा सकारात्मक संदेश संपूर्ण जगामध्ये गेला आहे.

३७० कलम रद्द केल्यानंतर कश्मिरमध्ये रक्ताचे पाट वाहतील,असे वातावरण करणाऱ्यांनाही आजच्या निकालाने उतर मिळाले असल्याचे विखे पाटील म्हणाले. हरीयाणाच्या विजयामुळे तसेच जम्मू काश्मिरमध्ये मिळालेल्या यशामुळे भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आत्मविश्वास वाढला असून आजचा विजय म्हणजे लोकांसाठी अधिकचे काम करण्यासाठी मिळालेली ऊर्जा असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe