जबर मारहाण, एकाचा मृत्यू.. अहमदनगरमध्ये खळबळ

अहमदनगर जिल्ह्यातून मारहाणीबाबत वृत्त आले असून या मारहाणीत एकाचा मृत्यूही झाला आहे. मागील भांडणाच्या कारणावरून हा वाद झाला असून तरुणाच्या पोटात मारहाण केल्याने हा तरुण मृत्युमुखी पडला असल्याची माहिती समजली आहे.

Ahmednagarlive24 office
Published:
marahan

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून मारहाणीबाबत वृत्त आले असून या मारहाणीत एकाचा मृत्यूही झाला आहे. मागील भांडणाच्या कारणावरून हा वाद झाला असून तरुणाच्या पोटात मारहाण केल्याने हा तरुण मृत्युमुखी पडला असल्याची माहिती समजली आहे.

ही घटना तालुक्यातील खडका येथे घडली. मृत तरुणाच्या वडिलांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार नेवासा पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत भाऊसाहेब परभत नेमाणे (मूळ रा. शिरेसायगाव, ता. गंगापूर, हल्ली रा. खडका फाटा, ता. नेवासा) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. ३१ जुलै रोजी मुलगा शरद नमाणे सायंकाळी साडेपाच वाजता घरासमोर उलट्या करत असताना दिसला.

त्याला त्याबाबत विचारले असता सकाळी साडेअकरा वाजता अमोल खेमनर याच्या शेतात गेलो असता मागील मारहाणीच्या कारणावरून अमोल किसन खेमनर, वच्छलाबा किसन खेमनर व किसन खेमन यांनी शिवीगाळ दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी पोटात मारहाण केल्याचे सांगितले.

शरद यास पोटदुख व उलट्याचा त्रास होत असल्याने पत्न सुशीलाबाई हिने त्यास दवाखान्यात उपचारासाठी नेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शरद याचा त्रास वाढतच गेला त्यास सरकारी रुग्णालयात दाखल केल असता अडीच वाजता त्यास मृत घोषित केले.

या फिर्यादीवरून अमोल किसन खेमनर, वच्छलाबाई किसन खेमनर व किसन खेमनर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकास अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारी घटना सातत्याने वाढत चालल्या आहेत. अत्याचार, मारहाण, खून आदी घटना होताना दिसत आहेत.

पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून त्यांचा कायमचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे अशी मागणी नागरिकनातून होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe