अहमदनगरमधील ११४ गावांसह ६३१ वाड्यांत पाणीटंचाई ! मुदत संपल्याने टँकर बंद, हजारो लोकांची पाण्यासाठी वणवण

अहमदनगर जिल्ह्यात मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील साधारण २३८ टँकर जून महिन्यात बंद करण्यात आले. पाऊस झालेला असला तरी अजूनही जिल्ह्यातील ११४ गावे आणि ६३१ वाड्यांमध्ये पाणीटंचाई सुरु आहे.

Ahmednagarlive24 office
Published:
pani tanchai

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील साधारण २३८ टँकर जून महिन्यात बंद करण्यात आले. पाऊस झालेला असला तरी अजूनही जिल्ह्यातील ११४ गावे आणि ६३१ वाड्यांमध्ये पाणीटंचाई सुरु आहे.

दरम्यान ३० जूनला पाणीटंचाई उपाययोजनेचा कालावधी संपल्याने सोमवारपासून टँकर बंद झाले असल्याने या पाण्याचे दुर्भिक्ष्य असणाऱ्या गावातील जनतेवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आलीये. दरम्यान, प्रशासनाकडून टंचाईग्रस्त गावांतील पाणी परिस्थितीचा अहवाल मागविण्यात आला आहे.

त्यामुळे टंचाई उपाययोजनांना आणखी महिनाभर मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. गेल्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. त्यामुळे नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यापासूनच पाथर्डी तालुक्यात टँकर सुरू होते. मार्च महिन्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या.

त्यानंतर टँकरची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. ९ जूनपर्यंत जिल्ह्यात ३४७ टँकर सुरू होते. या टँकरद्वारे ३४८ गावे आणि १८६७ वाड्यांतील ६ लाख ६० हजार ९८० लोकसंख्येला पाणीपुरवठा सुरू होता. यामध्ये पाथर्डी, कर्जत, पारनेर, श्रीगोंदा व शेवगाव या पाच नगरपालिकांचा देखील समावेश होता.

मृग नक्षत्राचे दमदार आगमन झाले. त्यामुळे बहुतांश तालुक्यांत भूजलपातळी वाढली गेली. त्यामुळे टप्प्याने टँकरची संख्या कमी होत गेली. ३० जूनपर्यंत २३८ टँकर बंद झाले आहेत. यामध्ये कर्जत, जामखेड आदी तालुक्यांतील सर्वच टँकर तसेच पारनेर, शेवगाव, पाथर्डी आदी नगरपालिका क्षेत्रातील टँकरचा समावेश आहे.

गेल्या आठ दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे अद्याप काही तालुक्यातील गावांची भूजल पातळी म्हणावी अशी वाढली नाही. काही ठिकाणी पाणी वाढले. परंतु गढूळ असल्यामुळे ३० जूनपर्यंत १०९ टँकर धावत होते.

मात्र, ३० जूनला टंचाई उपाययोजनेची मुदत संपल्यामुळे १ जुलैला टैंकर धावलेच नाहीत. त्यामुळे ११४ गावे ६३१ वाड्यांतील जवळपास २ लाख जनतेवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe