Ahmednagar News : तीर्थयात्रेच्या नावाखाली ट्रॅव्हल्स कंपनीकडून पाथर्डीच्या महिलांची फसवणूक : संतप्त महिलांनी घेतला ‘हा’ पवित्रा

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने महिलांसाठी बालाजी दर्शन यात्रेचे आयोजन केले होते. सुरुवातीलाच पैसे जमा केलेले असताना बस चालकांनी परत पैसे मागितले असता, आम्ही पैसे भरलेले आहेत, मग पुन्हा पैसे कशाला मागता, असे म्हणताच चालकांनी महीलांना डिझेल संपेल तेथे सोडुन देवु, असे म्हटल्याने एकच खळबळ उडाली. संतप्त महीलांनी आम्हाला तीर्थयात्रेला जायचे नाही, आमचे पैसे परत करा, असे सांगितले. आमचे पैसे द्या अन्यथा गाड्या सोडणार नाहीत, असा पवित्रा महीलांनी घेत दोन ट्रॅव्हल्स खरवंडीत थांबुन ठेवल्या आहेत.

बालाजीला देवदर्शनासाठी जाणाऱ्या खरवंडी, किर्तनवाडी, ढाकणवाडी, येळी येथील ९० महिलांना आयोजकांनी बारा तास खरवंडी येथील हाँटेलशेजारी बसवुन ठेवले. २३०० प्रत्येक महिलेने दिलेले असताना अचानक ५०० रुपये प्रती महीलेला जमा करायला लावले. पुन्हा डिझेल भरण्यासाठी प्रती महीला १२०० रुपये द्यावे लागतील, असे सांगुन महीलांची अडवणुक केली. त्यामुळे संतप्त महीलांनी बालाजी ट्रीप रद्द करुन आमचे २ लाख ७ हजार रुपये द्या तरच गाड्या सोडू अन्यथा दोन ट्रॅव्हल्स खरवंडीतुन हालु देणार नाहीत, असा पवित्रा घेतला.

आमच्याकडे तक्रार आली आहे. हा कार्यालयाचा भाग नाही. मात्र, तरीही वरीष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कल्पना दिली आहे. महीलांचे पैसे तातडीने परत करा,असे संबंधीत महीलेला सांगितले असल्याचे महीला आर्थिक विकास महामंडळाचे तालुका व्यवस्थापक बाबासाहेब बांगर यांनी सांगितले. महीला आर्थिक विकास महामंडळाच्या सहयोगीनी हिरा माळवे यांनी खरवंडी, येळी, किर्तनवाडी, ढाकणवाडी येथील महीलांसाठी बालाजी दर्शन यात्रेचे आयोजन एका केल्याचे सांगितले. सुरुवातीला ११०० रुपयांत दर्शन अशी जाहीरात केली.

नंतर १५०० महीला प्रमाणे पैसे जमा केले. काही दिवसांनी पुन्हा ८०० रुपये प्रति महीला, असे पैसे जमा केले. ३ जुनला ९० महीलांना दोन ट्रॅव्हल्समधुन रात्री १० वा. जाण्याचे ठरले. पुर्णब्रम्ह हाँटेल खरवंडी येथे जमण्यास सांगितले. महीला आल्या, गाड्या मात्र उशीरा आल्या. महीला पहाटे पाच वाजता गाडीत बसल्या. या वेळी चालकांनी आम्हाला पैसे मिळालेले नाहीत. डिझेलसाठी ५०० रुपये प्रति महीला, असे ४५ हजार रुपये जमा केले.

किर्तनवाडी येथे महीला गाडीत बसत असताना डिझेल संपल्यावर पुन्हा १२०० रुपये प्रती महीला पैसे जमा करावे लागतील, असे गाडी चालकांनी महीलांना सांगितले. आम्ही पैसे भरलेले आहेत, मग पुन्हा पैसे कशाला मागता, असे म्हणताच चालकांनी महीलांना डिझेल संपेल तेथे सोडुन देवु, असे म्हटल्याने एकच खळबळ उडाली. संतप्त महीलांनी हिरा माळवे यांना संपर्क केला. आम्हाला तीर्थयात्रेला जायचे नाही, आमचे पैसे परत करा, असे सांगितले. आमचे पैसे द्या अन्यथा गाड्या सोडणार नाहीत, असा पवित्रा महीलांनी घेतला आहे. दोन ट्रॅव्हल्स खरवंडीत थांबुन आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe