अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- संगमनेर बस आगारातील २३ कर्मचाऱ्यांचे निलंबन करूनही संप चाळीसव्या दिवशीही सुरूच आहे.
सरकारकडुन चर्चेला बोलवन्यात येत असलेल्या संघटनांवर आमचा विश्वास नसल्याचे संपकरी कर्मचारी सांगत आहे.
शासनात विलनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.
दरम्यान गुणरत्न सदावर्ते यांच्यावर आमचा विश्वास असल्याचे देखील संगमनेर बस आगारातील कर्मच्याऱ्यांनी सांगितले आहे.
संगमनेर बस आगारात ४० व्या दिवशी संपकरी आंदोलक आपल्या शासनात विलगीकरनाच्या मागणीवर ठाम आहेत.
विशेष म्हणजे या संपात महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो आहे.
सरकारकडुन पगारवाढ करून देखील कर्मचारी मात्र संप मागे घेण्याच्या विचारात दिसत नाही आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम