अशोक कारखान्याच्या 21 जागांसाठी 277 उमेदवारी अर्ज दाखल

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :-   श्रीरामपूर तालुक्याचा कामधेनू म्हणून प्रसिद्ध असलेला अशोक सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी 21 जागांसाठी 277 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते.(ashok sugar factroy election)

काल उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली. या छाननीत अनेक दिग्गज सभासदांचे उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आले आहेत. यावर संबंधित उमेदवारांनी आक्षेप घेतला.

यावर निवडणूक अधिकार्‍यांपुढे युक्तीवाद झाला. याबाबत आज मंगळवार दि.21 डिसेंबर रोजी निर्णय होण्याची शक्यता आहे. अशोक सहकारी साखर कारखान्याची 21 जागांसाठी निवडणूक होत आहे.

यासाठी 271 जणांनी 277 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. कारखान्यास पाच वर्षात किमान तीन वेळा ऊस दिला पाहिजे हे कारण पुढे करुन काल उमेदवारी अर्जाच्या छाननीत अनेक दिग्गज उमेदवारांचे उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अवैध ठरवले.

यावर संबंधितांनी आक्षेप घेतला. ज्या सभासदांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले त्यांच्यावतीने काल अ‍ॅड. अजित काळे यांनी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे बाजू मांडली.

या युक्तीवादानंतर निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी याबाबतचा निर्णय राखून ठेवला. याबाबत आज मंगळवार दि.21 डिसेंबर रोजी निर्णय होण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe