अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :- श्रीरामपूर तालुक्याची कामधेनू म्हणून ओळखला जाणारा अशोक सहकारी साखर कारखान्याच्या 21 जागांच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठीडॉ. वंदना मुरकुटे यांच्यासह दोन जणांचे तीन अर्ज दाखल झाले.(Sugar factory)
तर 55 जणांनी 163 उमेदवारी अर्ज नेले आहेत. या निवडणुकीसाठी माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या स्नुषा व पंचायत समितीच्या सभापती डॉ. वंदना ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी विरोधी गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
तर सत्ताधारी गटाचे कारखान्याचे संचालक पोपटराव बाबुराव जाधव यांनी सर्वसाधारण वडाळा महादेव गटातून 2 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
एकंदरीतच अशोक कारखान्याची निवडणूक जाहीर झाल्याने राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान दि. 17 डिसेंबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.
20 डिसेंबरला उमेदवारी अर्जाची छाननी केली जाणार आहे. 21 डिसेंबर ते 4 जानेवारी या कालावधीत उमेदवारी अर्ज माघारीची मुदत आहे. दि. 16 जानेवारीला मतदान होवून 17 जानेवारीला मतमोजणी केली जाणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम