अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2021 :- अशोक सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी 277 भरण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांपैकी 49 उमेदवारी अर्ज नामंजूर करण्यात आले असून 194 उमेदवारी अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.
श्रीरामपूर तालुक्याचा कामधेनू म्हणून प्रसिद्ध असलेला अशोक सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी 21 जागांसाठी 277 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली. छाननीत 49 जणांचे उमेदवारी अर्ज नामंजूर करण्यात आले.
यामध्ये सलग तीन वर्ष ऊस कारखान्याला घातला नाही म्हणून उपविधीप्रमाणे किशोर बकाल (पाटील), अॅड. सर्जेराव कापसे तसेच खिर्डीचे सरपंच प्रभाकर कांबळे यांचे उमेदवारी अर्ज नामंजूर करण्यात आले.
दरम्यान या निर्णयाच्या विरोधात हे तिघेही नगरच्या प्रादेशिक सह. संचालक (साखर) यांच्याकडे अपिल करणार असल्याचे किशोर बकाल यांनी सांगितले.
आम्हाला जी उपविधी( नियमावली) देण्यात आली त्यानुसार आमचा अर्ज नामंजूर करता येणार नाही, असे या तिघांच्यावतीने अॅड. अजित काळे यांनी बाजू मांडत निवडणूक अधिकार्यांनी त्यांच्याकडे असणार्या उपविधीप्रमाणे निकाल न देता वकीलांकडे असणार्या उपविधीप्रमाणे निकाल दिल्याचे त्यांचे म्हणणे होते. या विरोधात नगर साखर सह. संचालकांकडे अपिल करणार असल्याचे या तिघांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम