अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2021 :- संगमनेर उपविभागातील संगमनेर तालुक्यातील 5 ग्रामपंचायत जागांसाठी 74.63 टक्के मतदान पार पडले. तर अकोले तालुक्यातील 4 ग्रामपंचायत जागांसाठी 67.02 टक्के मतदान पार पडले.(polling)
संगमनेर तहसीलदार अमोल निकम व अकोले तहसीलदार सतीश थेटे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक पार पडली. संगमनेरमधील समनापूर, कुरकुटवाडी, ओझर खुर्द आश्वी बु.,वडगांवलांडगा या 5 ग्रामपंचायत जागांसाठी 5 मतदान केंद्रांवर मंगळवारी सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरूवात झाली.
सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान पार पडले. एकूण 74.63 टक्के मतदान झाले. सर्वाधिक 81.85 टक्के मतदान समनापूर ग्रामपंचायतीत झाले.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 19 जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. बोरबन, म्हसवंडी, व मिरपूर या 3 ग्रामपंचायतींमधील 5 जागांसाठी एकही अर्ज प्राप्त नाही.
तर खराडी, चिंचपूर, मिर्झापूर, पळसखेडे, काकडवाडी, निमगांवटेंभी, कोंची मांची, निमगावजाळी या 8 ग्रामपंचायतींच्या 8 जागा बिनविरोध करण्यात आल्या आहेत.
संगमनेर तालुक्यात 35 निवडणूक कर्मचार्यांची यासाठी नेमणूक करण्यात आली होती. तर 5 पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते.
अकोले तालुक्यात यासाठी 4 मतदान पथके, प्रत्येक पथकात 6 कर्मचारी व याशिवाय 2 राखीव पथके नियुक्त करण्यात आली होती. ईव्हीएम मशीनद्वारे मतदान घेण्यात आले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम