अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :- नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथील सराईत गुन्हेगार सागर रोहिदास मोहिते याने तरूणांना गावठी कट्टे व जिवंत काडतुसे देत ते विक्री करण्यासाठी पाठविले होते.
त्यातील तिघांना अटक करण्यात नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) यश आले आहे. या आरोपींकडून १ लाख ७२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
किशोर बाळासाहेब खामकर (वय ३२. रा. राजुरी, ता. राहाता), किशोर साईनाथ शिणगारे (वय २८, रामवाडी ता. नेवासा), अभय अशोक काळे (वय २४, रा. शिरसगांव ता.नेवासा, जि.अ.नगर) अशी पकडण्यात आलेल्या
आरोपींचे नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी ki, राहुरी फॅक्टरी येथे सापळा लावून केलेल्या कारवाईत किशोर वाळासाहेब खामकर (रा. राजुरी, ता. राहाता),
किशोर साईनाथ शिणगारे (रा.गोमाळवाडी ता. नेवासा) याना पकडण्यात आले. यावेळी त्याची अंगझडती घेतली असता दोन गावठी कट्टे, सहा जिवंत काडतुसे, व प्लेझर मोपेड गाडी असे एकूण १ लाख २१ हजार २०० रुपयांचा मुद्दे माल जप्त करण्यात आला.
तर पाठलाग करून पकडण्यात आलेला आरोपी अभय अशोक काळे (रा.शिरसगाव,ता.नेवासा,जि.अ.नगर) याची अगंझडती घेतली असता, त्याच्याकडे दोन गावठी व सहा जिवंत काडतुसे असा एकूण ५१ हजार २०० रुपयांचा मुद्दे माल जप्त करण्यात आला.
राहुरी व एमआयडीसी पोलिस ठाण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे सफौ.राजेंद्र वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तर विवेक लक्ष्म शिंदे (रा.घोगरगाव रोड, टाकळीभान,ता.श्रीरामपूर) हा फरार झाला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम