तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर ‘तो’ बिबट्या जेरबंद

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :-  श्रीरामपूर शहरातील नॉर्दन ब्रांच जवळ असलेल्या मोहटा देवी मंदिर रोड भागात एक लहान मुलगी व लहान मुलांसह अनेकांना जखमी करणारा नर जातीच्या बिबट्या ला पकडण्यात प्रशासनाला यश आले आहे.

यामध्ये अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर दिपाली काळे यांच्यासह श्रीरामपूरचे डीवायएसपी श्री.संदीप मिटके यांनी विशेष प्रयत्न केले.

तसेच वन विभागाच्या वनाधिकारी सौ.धनवटे व श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.सानप यांनी देखील चोख कर्तव्य पार पाडले.

दरम्यान हा बिबट्या परिसरातील श्री.शिरसाठ यांच्या घराच्या जवळील बोळीमध्ये लपलेला होता.त्यामुळे वनविभागाचे कर्मचारी संतोष पारदे,

रवींद्र पडोळे,लक्ष्मण गिरकर हे या बिबट्याला पकडत असताना बिबट्याने वन विभागाचे कर्मचारी लक्ष्मण गिरकर यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना जखमी केले.

यावेळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ भुलीचे इंजेक्‍शन बिबट्यावर मारून बिबट्याला बेशुद्ध केले.त्यानंतर त्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले.

तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर प्रशासनाला यश मिळाले.यावेळी बिबट्याला पकडण्याचा हा सर्व प्रसंग हाताळण्यामध्ये श्रीरामपूरचे डिवायएसपी शसंदीप मिटके यांनी विशेष भूमिका पार पाडली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe