अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील बडाळा महादेव येथील कैसर तय्यबजी फार्म येथे परप्रांतिय तरुणाचा खून करुन मृतदेह फेकण्यात आला.
या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दावेद नागेय्या कंदामला, वय २८ रा. गजवेल, ता. सिद्धीपेठा, राज्य तेलंगणा या तरुणाच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध भादवि कलम ३०२,२०१९ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दावेद कंदामला यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा चुलत भाऊ यादगीर कनकैय्या, वय ३२ रा. नारमेटा, जि. सिद्धपेठ,
राज्य तेलंगणा याचा १३ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान कुणीतरी अज्ञात आरोपीने गळा दाबून जिवे ठार मारुन खून केला. आणि मृतदेह शेती गट नं. ८९ मध्ये फेकून देण्यात आला.
घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. दीपाली काळे, डिवायएसपी संदीप मिटके, पोनि संजय सानप यांनी भेट दिली. परप्रांतिय तरुणाचा कोणी खून केला? का केला? याचा पुढील तपास पोनि सानप हे करीत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम