बसस्थानकावर प्रवाशी महिलेकडील दागिणे चोरले

Published on -

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :-  प्रवाशी महिलेचे 64 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना नगर शहरातील पुणे बसस्थानकावर घडली.

याप्रकरणी करिष्मा समीर शेख (वय 24 रा. शहापूर ता. नेवासा) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी शेख या पुणे बसस्थानक येथे आल्या होत्या. त्यांनी पिवळ्या रंगाच्या पर्समध्ये 64 हजार रूपये किंमतीचे दागिने, आधारकार्ड आणि पॅनकार्ड ठेवले होते.

चोरट्यांनी गर्दीचा गैरफायदा घेऊन पर्समधील दागिणे, कागदपत्रे चोरले. पोलीस हवालदार सोनवणे पुढील तपास करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe