विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :-  जन्मताच मुलाचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर विवाहितेस जबाबदार धरून तू आजारी असतेस.

तुला नांदायचे असेल, तर माहेरून ५० हजार रुपये आणावेत, असे म्हणत शिवीगाळ, मारहाण करून काैटुंबिक हिंसाचार केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा अकोले पोलिसांनी दाखल केला.

मोनिका सागर सोनटक्के (वय २३, देवठाण) यांच्या तक्रारीवरून अकोले पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर पती सागर किशोर सोनटक्के, सासू ताराबाई किशोर सोनटक्के,

भाया सचिन किशोर सोनटक्के, जाऊबाई अश्विनी सचिन सोनटक्के, मामा सासरे राजेंद्र पंढरीनाथ कोळ, मावस सासू शांताबाई गायकवाड (सर्व रा. शिर्डी, ता. राहाता) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

फिर्यादीत नमूद आहे की, शिर्डी येथे २६ ऑगस्ट २०१९ ते ८ सप्टेंबर २०२१ दरम्यान फिर्यादी ही सासरी नांदत असताना फिर्यादीचे पती सागर सोनटक्के, सासुबाई ताराबाई सोनटक्के, भा

या सचिन सोनटक्के, जाऊबाई सोनटक्के, मामा सासरे कोळ, मावस सासू शांताबाई यांनी फिर्यादीचा वारंवार शारीरिक व मानसिक छळ केला.

फिर्यादीच्या माहेरच्यांनी पैसे दिले तरीही सासरच्या लोकांनी फिर्यादीवर संशय घेत व तिच्या मुलाचा जन्म झाल्यावर ते लगेचच मृत झाल्याने

सासरचे लोकांनी तू काळ्या पायाची आहेस, असे म्हणून घरातून काढून दिले. या फिर्यादीवरून अकोले पोलिसांनी पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe