अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) भाग्यश्री बानायत यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात साईबाबा विशिष्ट धर्माचे असल्याचा उल्लेख केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामुळे भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे.
बानायत यांनी आपण केलेल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त करत मला ज्यांनी माहिती दिली त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने या वादग्रस्त विधानावरून संतप्त झालेल्या शिर्डीतील ग्रामस्थ व साईभक्तांमधील नाराजीवर पडदा पडला.
नेमके प्रकरण काय? जाणून घ्या साईबाबा संस्थानच्या सीईओ भाग्यश्री बानायत यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना साईबाबा विशिष्ट धर्माचे असल्याचा उल्लेख केला होता.
त्याचा व्हीडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या उल्लेखामुळे भाविकांच्या श्रध्देला ठेस पोहचवणारा असल्याची भावना व्यक्त होऊ लागली.
दरम्यान सोमवारी साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाच्या बैठकीत शिर्डीतील सर्वपक्षीय ग्रामस्थांनी जावून सीईओ बानायत यांच्या वादग्रस्त विधानाचा निषेध केला.
झालेल्या प्रकाराबद्दल माफ़ी मागावी अन्यथा शिर्डीकर गाव बंद ठेवून निषेध नोंदवतील असा इशारा देण्यात आला. साईबाबांच्या संदर्भात माझ्याकडून जे वक्तव्य केले गेले,
त्यामुळे ग्रामस्थ आणि भाविकांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करते. मला ज्यांनी याबाबत माहिती दिली त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे साईबाबा संस्थानच्या सीईओ भाग्यश्री बानायत यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम