अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2021 :- आजच्या युगात आता सर्वकाही अपडेट होत असताना आता चोर चोऱ्या करण्याच्या पद्धती देखील अपडेट करू लागले आहे.
याचाच काहीसा प्रत्यय श्रीरामपूर तालूक्यात पाहायला मिळाला आहे. तालुक्यातील गळनिंब येथे भरदिवसा एका बंगल्यात चोरटे प्लंबर म्हणून आले आणि त्यांनी तेरा ते चौदा तोळे सोने, चांदी, तीस हजारांची रोकड असा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी बाभळेश्वर औट पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
याबाबत अधिक माहिती अशी कि, गळनिंब येथील श्रीकांत संजय भोसले यांच्या बंगल्यासमोर 3 ते 4 वाजेच्या दरम्यान गेटसमोर एक कार उभी करून गेटच्या आत एकाने प्रवेश केला.
श्रीकांत यांचे वडिल पोर्चमध्ये बसले असताना त्यांना विचारले की सरांनी आम्हाला प्लबिंगचे काम पाहण्यास सांगितले आहे, तुमची पाण्याची टाकी कुठे आहे, असे विचारले.
वडिलांचे वय जास्त असल्याने व दिसण्यास कमी असल्याने त्यांनी जिन्यावरून गच्चीवर असलेली पाण्याची टाक्या दाखवल्या.
चोरटयांनी कारमधून उतरत घराच्या बेडरूम मध्ये प्रवेश करत कपाटे उचकून सोनं,चांदीसह रोख रक्कम लांबविली. ही बाब संजय भोसले यांच्या लक्षात आल्यानंतर शेजारी पाजारी सांगितले तोपर्यंत चोरटे बेलापूरच्या दिशेने पसार झाले होते.
या घटनेची माहिती समजताच घटनास्थळी लोणी पोलीस पथक हजर झाले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम