सोशल मीडियावर संभाषण व्हायरल; ‘या’ पोलीस निरीक्षकांची नियंत्रण कक्षात बदली

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :-  श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचार्‍यांचे मोबाईलवरील आक्षेपार्ह संभाषण तसेच पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी यांचे संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्या दोन पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात आले होता.

आता याप्रकरणी पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील आदेश काढले आहेत.

श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचा प्रभारी पदभार सहायक पोलीस निरीक्षक किरण सुरसे यांच्याकडे देण्यात आला आहे. पोलीस नाईक लक्ष्मण दशरथ वैरागळ आणि पोलीस हवालदार योगेश शिवाजी राऊत यांना रविवारी रात्री निलंबित करण्यात आले होते.

श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन पोलीस कर्मचार्‍यांमधील मोबाईलवरील संभाषण व पोलीस निरीक्षक आणि एक पोलीस कर्मचारी यांचे संभाषण व्हायरल झाले आहे.

पोलीस खात्याची बदनामी करणे हे संभाषण आहे. पोलिसांची समाजातील प्रतिमा मलिन झाली आहे. हे वर्तन बेशिस्त आणि निष्काळजीपणाचे असल्याचा अहवाल श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके

यांनी या संभाषणाच्या अनुषंगाने शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना पाठविला होता. यानंतर निलंबन व बदलीची कारवाई करण्यात आली आहे.