अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- नगर-कोपरगाव महामार्गावर पिंपरी निर्मळ व बाभळेश्वर गावाच्या सिमेलगत हॉटेल सतलजजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत हरणाचा मृत्यु झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, पिंपरी निर्मळ- बाभळेश्वर शिवेजवळ हॉटेल सतलजच्या जवळ कोपरगाव कोल्हार महामार्गाच्या कडेला हे मृत हरण आढळले आहे.

file photo
महामार्गावरून जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने या हरणाचा मृत्यु झाला असल्याचा प्राथमीक अंदाज आहे.
दरम्यान याबाबत सामाजीक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे.
व या विभागाचे अधिकारी संबंधित ठिकाणी पोहचले असून पुढील कार्यवाही करत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम